दिनेश केडिया यांनी अवघ्या 5 गायींवर सुरू केलेला हा व्यवसाय आज यशस्वी झाला. यात त्यांना दिवसाला मिळणारे दूध, गोमूत्र आणि शेण या तिन्ही वस्तू फुकट जात नाहीत. त्यातून त्यांना नैसर्गिक रित्या दुय्यम पद्धतीने प्रक्रिया करून बाजारात धूप, अगरबत्ती, गोवऱ्या आणि गोमूत्र म्हणून विकण्यास देतात. तसेच गायीला चारा किंवा लागणारे खाद्य ही येणारे पर्यटक किंवा दानधर्म करणारी माणसे आपल्या वजनाचा खाद्य गायीला दान म्हणून करतात. त्यामुळे त्यांना गायीया लक्ष्मी असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांना दिवसेंदिवस मिळणारा नफा यातून केडिया यांना भविष्यात पाळीव प्राणी, गायी, बैल तसेच वनस्पती, वेगवेळी झाडे यांचा मोठ्यात मोठा साठा करायचा आहे.
advertisement
एकदा केलेली गुंतवणूक आज त्यांच्या व्यवसायाला फायदेशीर ठरली आहे. गायीसाठी चरण्यापासून ते फिरण्यापर्यंत पूर्ण व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे. रुपेश देसले हे या ठिकाणची व्यवस्था उत्तम रित्या बघत असल्याने एकदम स्वच्छ आणि निसर्गरम्य वातावरणात हा गायी पालन व्यवसाय उभारला आहे. त्यामुळे येणारे पर्यटक किंवा कार्यक्रमासाठी येणारी लोक इथे निवासी किंवा प्राण्यासोबत मन मोकळे करायला येताना दिसतात. अतिशय सुटसुटीत वातावरणात हा व्यवसाय उभारला आहे. मुख्य म्हणजे त्यांच्याकडे असलेले बैल किंवा गायी ते विकत नाहीत तर त्यांची वाढ काढून ते त्यांच्या गो शाळेत ठेऊन देत असतात. या गायी बैल हिच माझी संपती त्यामुळे ती विकत दिले जात नाही तर तिथेच ठेवण्यात येतात.