नेमका कोणता घेण्यात आला आहे निर्णय
मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली पूर्वेतील कोळेगाव भागात मुख्य पाणी पाइपलाइन बदलण्याचे मोठे काम सुरू असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. 12 व्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत ही पाइपलाइन बदलली जात आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. तसेच डोंबिवलीतील अनेक भागांना आज दिवसभर पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
advertisement
जाणून घ्या वाहतूक बदल
ठाणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 9 डिसेंबरच्या रात्री 12 वाजेपासून 21 डिसेंबरच्या पहाटे 1 वाजेपर्यंत कोळेगाव चौक ते प्रीमियर मैदान आणि पुढे कल्याण-शिल रोड या मार्गावरील वाहतूक बंद राहील. पाइपलाइनचे काम सुरळीत पार पाडण्यासाठी हा निर्णय घेतला असून नागरिकांनी वाहतूक बदलांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कोळेगाव चौकातून प्रीमियर मैदानाकडे जाणाऱ्या वाहनांसाठी बदल
कोळेगाव चौकातून प्रीमियर मैदान किंवा कल्याण-शिल गेटकडे जाणारी सर्व वाहने या काळात थांबवली जातील. या वाहनांसाठी बदलापूर पाइपलाइनमार्गे रोहाणे काटाई त्यानंतर बदलापूर चौक असा पर्यायी मार्ग देण्यात आला आहे. या मार्गातून वाहने आपला पुढील प्रवास करू शकतील.
कोळेगावातून कोळेगाव चौकात येणाऱ्या वाहनांसाठी बदल
कोळेगावातील शिवसेना शाखेजवळून कोळेगाव चौकात येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद असेल. या सर्व वाहनांनी प्रीमियर मैदानाच्या बाजूने कल्याण-शिल रोडमार्गे हनहट भागाचा पर्यायी मार्ग वापरावा, असे पोलिसांनी सांगितले आहे.
पाणीपुरवठा बंद
पाणीपुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार पाइपलाइन बदलण्याच्या कामामुळे डोंबिवलीतील पाणीपुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. आज सकाळी 9 वाजल्यापासून ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. डोंबिवली पूर्व आणि डोंबिवली पश्चिम या दोन्ही भागांतील अनेक वसाहती आणि परिसर पाण्याविना राहणार असल्याने नागरिकांनी पाण्याची योग्य साठवण करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
