अधिकृत अधिसूचनेनुसार, हा अडथळा दूर करण्यासाठी ब्रिजच्या पुनर्बांधणीची महत्त्वपूर्ण कामे 16 नोव्हेंबर 2025 पासून सुरू होत असून ती 31 मार्च 2026 पर्यंत चालणार असल्याची माहिती मिळत आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, फ्रेट कॉरिडॉरवरील डबल-डेकर कंटेनरला वाहतुकीसाठी हा ओव्हरब्रिज अडथळा बनत होता. त्यामुळे, या परिसरात मालवाहतूक सुरळीत करण्यासाठी तो पूल पाडून त्या जागी नवीन पूल बनवला जाणार आहे. त्याच्या कामाला आजपासून सुरूवात झाली आहे.
advertisement
एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले की, ठाणे पोलिसांनी स्पष्ट केले की हे काम कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अधिकारक्षेत्रात येते. शिवाय त्यांनी वाहन चालकांना पर्यायी मार्ग देखील सांगितले आहे. तो पर्यायी मार्ग पुढील प्रमाणे...
- कल्याण → शिळफाटा
निळजे कमानजवळून सर्व वाहनांना प्रवेशबंद.
पर्यायी मार्ग : निळजे कमान → उजवीकडे लोढा पलावा वाहीनी → महालक्ष्मी हॉटेल → पुढे इच्छित स्थळी.
- लोढा पलावा / कासाबेला / हेवन / एक्सपिरिया मॉल → कल्याण
निळजे ब्रिज चढणीवरून कल्याणकडे जाणारा मार्ग बंद.
पर्यायी मार्ग : कल्याण–शिळ रोड → शिळफाटा → देसाई खाडी ब्रिज → सरस्वती टेक्सटाईल → यू-टर्न → पलावा फ्लायओव्हर.
- मुंब्रा / कल्याण फाटा → कल्याण (६ चाकी व जड वाहने)
कल्याण फाटा येथे प्रवेशबंद.
पर्यायी मार्ग : शिळफाटा → मुंब्रा बायपास → खारेगाव टोलनाका.
- कल्याण → मुंब्रा / कल्याण फाटा (६ चाकी व जड वाहने)
काटई (बदलापूर) चौक येथे प्रवेशबंद.
पर्यायी मार्ग : काटई चौक → खोणी नाका → तळोजा MIDC.
- तळोजा MIDC / नवी मुंबई → काटई चौक (६ चाकी व जड वाहने)
खोणी नाका, निसर्ग हॉटेल येथे प्रवेशबंद.
पर्यायी मार्ग : निसर्ग हॉटेल → उजवे वळण → बदलापूर पाईपलाइन → नेवाळी.
- अंबरनाथ / बदलापूर → काटई चौक (६ चाकी व जड वाहने)
खोणी नाका येथे प्रवेशबंद.
पर्यायी मार्ग : खोणी नाका → डावे वळण → तळोजा MIDC.
हलक्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग
- मुंबई/नवी मुंबई → कल्याण : दिवा–संदप रोड → मानपाडा → कल्याण–शिळ रोड
- ठाणे/मुंबई → कल्याण : मानकोली–मोटागाव–डोंबिवली मार्ग किंवा रांजनोली–कोनगाव–कल्याण मार्ग
- कल्याण/डोंबिवली/उल्हासनगर → मुंबई/नवी मुंबई : चक्कीनाका → श्री मळगाई पेड → नेवाळी → बदलापूर पाईपलाईन → तळोजा MIDC
- कल्याण/डोंबिवली → ठाणे/मुंबई : डोंबिवली → मोटागाव → मानकोली → दुर्गाडी → कोनगाव → नाशिक–मुंबई महामार्ग
निळजे ब्रिजच्या पुनर्बांधणीच्या कामाला किती दिवस लागतील याची माहिती ठाणे पोलिसांकडून देण्यात आलेली नाही. कल्याण– शिळ रोडवरील वाहतूक पुढच्या काही महिन्यांसाठी मोठ्या प्रमाणात विस्कळीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, नागरिकांनी प्रवासाची पूर्वतयारी करून पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे.
