घरात करता पुरुष म्हणजे दादाराव होते. लहान दोन मुले, बायको, आई वडील आणि भाऊ अस त्याचं कुटुंब होत त्यात दादारावावर कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी होती. ही जबाबदारी पेलत बाहेर नोकरी साठी फिरणे म्हणजे सोबत वेळ नव्हती. त्यामुळे त्यांच्या कडे स्वतःच्या व्यवसायाशिवाय पर्याय नव्हता. कंपनीत असताना ते कॅन्टिंगमध्ये काम करत होते त्यामुळे त्यांना वडापाव पासून जेवणापर्यंत सगळ्यांच गोष्टीचा अनुभव होता. 2002 साली त्यांनी व्यवसाय सुरू करण्याचा विचार केला परंतु त्या व्यवसायाला जागा नव्हती.
advertisement
पुन्हा त्याच परिस्थितीत उभे राहिले. आणि रस्त्यावरच वडापावचा धंदा सुरू केला. रस्त्यावरचा वडापाव असल्याने सुरुवातील लोकांचा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी अडीच रुपयाचा वडापाव 2 रु केला. हळूहळू लोकांना त्याचा वडापाव आणि चव आवडायला लागली. येणारी जाणारी शाळेतले विद्यार्थी सर्वजण त्यांचे वडापाव खाण्यासाठी गर्दी करू लागले.त्यामुळे दादाराव यांचा वडापाव व्यवसाय चांगलाच सुरू झाला.त्यात ते कंपनी बंद पडून पुन्हा उभे राहिले.दोन्ही मुलांना इंजिनियरिंगच शिक्षण दिले आज त्यांची दोन्ही मुले चांगल्या कंपनीत नोकरी करतात.
दादारावचे वय 58 असले तरी त्यांनी तीच जागा आणि तोच वडापाव आजही सुरू ठेवले. त्यांचं कुटूंब उभ करण्यासाठी या व्यवसायाने मोठा फायदा झाला त्यामुळे त्यांनी आज त्यांच्या भाच्याला या व्यवसायात घेतले.आणि भविष्यात हीच टपरी हाच वडापाव लोकांना देण्याचा प्रयत्न करू असे नितीन सोनवणे यांनी म्हटले.आज या वडापाव ला नाव ही मामा भाचे वडापाव आहे.या वडापाव मागे मामा भाच्याचे प्रेम आणि आपुलकी आपल्याला बघायला मिळते.