जाळ्यात कसे अडकले?
एसएसटी कॉलेजसमोर गोकुळनगर परिसरात प्रभावती संजय माळी राहतात. त्या किराणा दुकान चालवतात. त्याच परिसरात राहणारे मुकेश दत्तात्रय मोरे, अर्चना दत्तात्रय मोरे आणि त्यांच्या साथीदारांनी प्रभावती माळी तसेच सिद्धार्थ संजय चौधरी यांच्याशी संपर्क साधला. आरोपींनी क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास दररोज पाच टक्के परतावा मिळेल, असे सांगून विश्वास संपादन केला.
advertisement
नफ्याचं आमिष दाखवून व्यापाऱ्याला लुटलं
7 नोव्हेंबर ते 29 डिसेंबर 2025 या कालावधीत आरोपींनी वेळोवेळी पैसे गुंतवण्यास भाग पाडले. सुरुवातीला काही परतावा दिल्यानंतर मोठ्या रकमेची गुंतवणूक करून घेतली. मात्र नंतर पैसे परत न देता संपर्क टाळण्यात आला. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच प्रभावती माळी आणि सिद्धार्थ चौधरी यांनी हिललाइन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी तक्रारीच्या आधारे मुकेश मोरे, अर्चना मोरे आणि त्यांच्या इतर साथीदारांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. नागरिकांनी अशा परताव्याच्या आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.
