उल्हासनगरमध्ये कायद्याचं राज्य आहे की सावकारांचं
मिळालेल्या माहितीनुसार, लता उमाप यांनी काही कामासाठी वर्षभरापूर्वी रमेश आगळे याच्याकडून 50 हजार रुपये दरमहा 10 टक्के व्याजदराने घेतले होते. उमाप कुटुंब नियमितपणे दरमहा व्याजाची रक्कम देत होते. मात्र तरीही सावकाराकडून अधिक पैशांची मागणी सुरूच होती असा आरोप करण्यात आला आहे.
एटीएम कार्ड हिसकावलं, शिवीगाळ केली अन्
advertisement
26 जानेवारी रोजी दुपारी रमेश आगळे, तरुणा पारचे, रागिता खरात आणि आगळे याची पत्नी यांनी उमाप यांच्या घरी जाऊन गोंधळ घातला. यावेळी उमाप यांच्या सुनेचे कॅनरा बँकेचे एटीएम कार्ड जबरदस्तीने काढून घेतले. 50 हजार रुपये घेतल्याच्या बदल्यात अडीच लाख रुपये द्यावेत अशी मागणी करण्यात आली.
सावकारांच्या मुजोरीचा कळस
पैसे देण्यास नकार दिल्यामुळे आरोपींनी शिवीगाळ करत उमाप कुटुंबाला मारहाण केली. या घटनेमुळे कुटुंबात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर लता उमाप यांनी हिललाइन पोलिस ठाण्यात धाव घेत संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला.
तक्रारीच्या आधारे पोलिसांनी चारही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे. या प्रकरणामुळे शहरातील अवैध सावकारीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
