पीडीत गंभीर जखमी
अचानक झालेल्या या हल्ल्याने गायकवाड गंभीर जखमी झाले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी तत्काळ मदत करुन त्यांना मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर अधिक चांगल्या उपचारांसाठी त्यांना एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार डोक्यासह शरीरावर गंभीर जखमा असून काही तास परिस्थिती चिंताजनक होती.
advertisement
जुन्या वादातून तरुणावर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला
घटनेची माहिती मिळताच विठ्ठलवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. चौकशीदरम्यान हा हल्ला जुन्या वादातून झाल्याचे स्पष्ट झाले. आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्या शोधासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. या धक्कादायक घटनामुळे कॅम्प 4 परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्थानिकांनी पोलिसांकडे सुरक्षिततेची मागणी केली असून जुन्या रागातून होणारे हल्ले दिवसेंदिवस वाढताना दिसत असल्याने नागरिकांनी पोलिसांना गस्त वाढवण्याचे आवाहन केले आहे.
