TRENDING:

Crime News : पत्नीला संपवलं, मोबाईल बंद केला अन् गायब झाला, 8 महिन्यांनी...,उल्हासनगरात काय घडलं?

Last Updated:

Ulhasnagar Wife Murder Case Update : उल्हासनगरमध्ये पत्नीची हत्या करून आठ महिने फरार असलेल्या पतीला ठाणे गुन्हे शाखेने नाशिक येथून अटक केली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
कल्याण : उल्हासनगरमधील पत्नीच्या हत्येनंतर तब्बल आठ महिने फरार असलेल्या पतीला ठाणे शहर पोलिसांनी नाशिक येथून अटक करत मोठे यश मिळवले आहे. आनंद तुळशीराम सूर्यवंशी (वय 60) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून न्यायालयाने त्याला 14 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे अशी माहिती पोलिसांनी दिली.
News18
News18
advertisement

नेमके काय घडले होते?

मिळालेल्या माहितीनुसार,9 मे 2025 रोजी उल्हासनगर-3 येथील परिसरात ही धक्कादायक घटना घडली होती. मालमत्तेच्या वादातून आनंद सूर्यवंशी याने पत्नी सुरेखा सूर्यवंशी (वय 47) हिच्यावर धारदार शस्त्राने गळ्यावर वार करत तिची निर्घृण हत्या केली होती. या घटनेनंतर मध्यवर्ती पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

advertisement

गुन्हा घडल्यानंतर आरोपी आनंद सूर्यवंशी हा फरार झाला होता. पोलिसांना चकवा देण्यासाठी त्याने मोबाईल फोनचा वापर पूर्णपणे बंद ठेवला होता. तसेच तो वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये राहत आपली ओळख लपवत होता. त्यामुळे पोलिसांसमोर आरोपीचा शोध घेणे मोठे आव्हान ठरले होते.

पोलिसांना फसवण्याचा डाव अखेर फसला

दरम्यान ठाणे शहर मध्यवर्ती गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक सुरेश माळोदे यांना आरोपी आनंद सूर्यवंशी नाशिकरोड परिसरात लपून बसल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीनंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
APMC Market: डाळिंबानं मार्केट खाल्लं, रविवारी शेवगा आणि गुळाला किती मिळाला दर?
सर्व पहा

6 जानेवारी रोजी पोलिस पथकाने नाशिक येथे सापळा रचत आरोपीला अटक केली. अटकेनंतर आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला 14 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. सध्या पोलिस आरोपीकडून या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
Crime News : पत्नीला संपवलं, मोबाईल बंद केला अन् गायब झाला, 8 महिन्यांनी...,उल्हासनगरात काय घडलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल