TRENDING:

Success Story: जिद्द ना सोडली! कल्याणच्या विमल भोसलेंची 200 महिलांच्या हाताला दिलं काम!

Last Updated:

आयुष्यात मेहनतीशिवाय पर्याय नाही परंतु त्या मेहनतीला प्रोत्साहन देणारे कोणी नसेल तर फायदा नाही. कल्याणजवळील अंबिवली येथील मोहने परिसरात राहणाऱ्या विमल भोसले यांनी खूप कष्टाने आणि मेहनतीने आपलं स्वत:चं साम्राज्य उभं केलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
आयुष्यात मेहनतीशिवाय पर्याय नाही परंतु त्या मेहनतीला प्रोत्साहन देणारे कोणी नसेल तर फायदा नाही. कल्याणजवळील अंबिवली येथील मोहने परिसरात राहणाऱ्या विमल भोसले यांनी खूप कष्टाने आणि मेहनतीने आपलं स्वत:चं साम्राज्य उभं केलं आहे. आपल्या मेहनतीवर उभी राहिलेली महिला आज फक्त आनंदी आणि समाधानी दिसत असल्या तरी त्या मागचे त्रास वेदना भोसले यांच्या वेगळ्याच होत्या.
advertisement

मुलीचं लग्नानंतरच आयुष्य बदलत हे जरी खरं असलं तरी काहीना जे सुख लग्नाआधी मिळालेलं नसत ते लग्नानंतर मिळतं. तर काहींना दोन्हीकडे सुखात आनंदात जीवन जगण्याची संधी मिळते. भोसले या मुंबई सारख्या शहरात जन्मलेल्या लग्नानंतर भोसले यांचं आयुष्य पूर्णपणे बदललं जी स्वप्न, इच्छा आणि आकांक्षा घेऊन लग्न केलं त्यातूनच नॉर्मल जीवन आयुष्य चूल आणि मूल याच गोष्टी बाईने कराव्या हे वारंवार त्यांना त्रास आणि मनाशी खटकत असताना त्यांनी आयुष्याच्या वाटेवर एकतर जीवन संपवन नाहीतर पर्याय काढून आयुष्यात यशस्वी व्हायचं बस.

advertisement

सुरुवातील सासरच्या लोकांचा फार सपोर्ट नव्हता, परंतु  मैत्रिणीची साथ आणि स्वतःवर विश्वास ठेवून आपल्या कलेमधूनच पुढे जाण्याचा मार्ग निवडला स्वतःवर  विश्वास ठेऊन पाऊल उचललं परंतु या एका पावला मागे फक्त मैत्रीची दोन पावले भक्कम होती. लहान मुले घरच सगळ आवरून आपल्या कलेला वेळ देणे म्हणजे खूपच त्रासदायक तरी त्यातून मार्ग काढत 2013 ला मोहन्यात सगळ्यात पहिल्यांदा ब्युटी पार्लर सुरू केलं आणि विमल भोसले यांचं आयुष्य बदलत गेल. आज त्या कष्टाने उभ्या राहिल्या पण 150 ते 200 महिलांना आपल्या कलेमधून स्वावलंबी बनवले आणि रोजगार उपलब्ध करुन दिला.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पुण्यातील खरटमल कुटुंबाचा अनोखा छंद, जुन्या ग्रामोफोनचा केला संग्रह,काय आहे खास?
सर्व पहा

एकीने त्रास सहन केला पण आज आसनगाव, वासिंद, मोहने, आंबिवली या ठिकाणच्या महिला स्वतः चा ब्युटीशियन चा हा व्यवसाय सुरू करत आहेत. भोसले यांना महिन्याला लाखो रुपये जरी कमवत असल्या तरी त्यांना महिलांचे समाधान महत्वाच आहे. आज त्यांच्या मोहन्यात दोन ब्रँच ओपन केलेत. यशस्वी झाल्यावर सर्वच सोबत असतात तसंच आज त्यांच्या सोबत हेच घडलं. म्हणून महिलांनी खचून न जाता मार्ग शोधायला हवा. आयुष्याला कंटाळलेली महिला एवढी सक्सेस होऊ शकते तर आपण का नाही यशस्वी होऊ शकत अस जर प्रत्येक महिलेनी ठरवलं तर महिला सक्षम होऊ शकते. आज त्यांनी त्यांच्या जुन्या स्टुडंट्स ना स्वतःच नवीन पार्लर ओपन करून देण्यासाठी मदत ही केली आणि या सर्वांसोबत आपले नाते जोपासले आहे.

advertisement

मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
Success Story: जिद्द ना सोडली! कल्याणच्या विमल भोसलेंची 200 महिलांच्या हाताला दिलं काम!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल