कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रात उल्हास नदीच्या मोहिली उदंचन केंद्रामधून उचलेले पाणी नेतिवली जल शुद्धीकरण केंद्रात शुद्ध करून डोंबिवली पूर्व आणि पश्चिम विभागामध्ये पाणी पुरवठा केला जातो. या जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत आणि यांत्रिकी उपकरणांच्या दुरुस्तीची अत्यावश्यक कामे हाती घेण्यात येत आहेत. पाणी बंदच्या काळामध्ये अनेक दुरूस्तीचे कामे केले जाणार आहेत. त्याचबरोबर डोंबिवली विभागाच्या वितरण व्यवस्थेच्या देखभाल आणि दुरूस्तीची कामेही करण्यात येणार आहेत.
advertisement
त्यामुळे येत्या मंगळवारी, 2 डिसेंबर रोजी सकाळी 09:00 ते सायंकाळी 06:00 वाजेपर्यंत (एकूण 9 तास) नेतिवली जलशुद्धीकरण केंद्रामधून डोंबिवली पूर्व व पश्चिम विभागांचा पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार आहे. महानगर पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने डोंबिवलीकरांना पुरेसा पाणी साठा करून ठेवण्याचे आवाहन केले आहे. उदंचन केंद्र, जलशुद्धीकरण आणि वितरण व्यवस्थेच्या दुरूस्तीचे कामे सुरळीत आणि नियोजित वेळेत पार पडण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, अशी विनंती महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने नागरिकांना केली आहे.
