लग्नाचा सोहळा पाहण्याआधीच काळाने झडप घातली
या अपघातात कल्याणमध्ये राहणारे नीलेश बुकाणे (वय38) आणि त्यांची बहीण वैशाली घुसळे (वय 35)यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दोघेही आपल्या नातेवाइकांसोबत सिन्नर तालुक्यातील फर्दापूर येथे आयोजित लग्न समारंभासाठी जात होते. कल्याणहून एकूण 11 प्रवासी कारने प्रवास करत होते.
पाटोळे परिसरात कारचा टायर फुटताच वाहन थेट पुढील अवजड वाहनावर आदळले. अपघाताचा मोठा आवाज होताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ महामार्गावर धाव घेत मदतकार्य सुरू केले. घटनेची माहिती मिळताच समृद्धी महामार्ग पोलीस, क्यूआरव्ही पथक आणि आपत्कालीन सेवा घटनास्थळी दाखल झाल्या. जखमींना तातडीने रुग्णवाहिका आणि महामार्गाच्या रुग्णवाहिकांद्वारे सिन्नर येथील रुग्णालयात हलवण्यात आले.
advertisement
उपचारादरम्यान नीलेश बुकाणे यांचा मृत्यू झाला तर काही वेळाने वैशाली घुसळे यांची मृत्यू झाला. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात सहा बालकांचा समावेश आहे.
