घरातील कामात गुंतली होती, पण मृत्यूने गाठले
मिळालेल्या माहितीनुसार, मीनाक्षी लामखडे या नेहमीप्रमाणे आपल्या घराच्या गच्चीवर तांदूळ वाळत घालत होत्या. यावेळी अचानक त्यांचा तोल गेला आणि त्या गच्चीवरून थेट खाली पडल्या. खाली पडताना त्यांना गंभीर दुखापत झाली. कुटुंबीयांनी आणि शेजाऱ्यांनी तात्काळ धाव घेऊन त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र डॉक्टरांनी तपासण्याआधीच त्यांना मृत घोषित केले.
advertisement
घटनेने बदलापूर सुन्न
या घटनेची माहिती मिळताच बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याचे पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलीस घटनास्थळी तपासणी करून घटनेचा तपास करत आहेत. प्राथमिक तपासात ही घटना अपघाती मृत्यू असल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र सर्व बाबींची सखोल चौकशी केली जात आहे. या अचानक घडलेल्या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
