नेमकी घटना घडली कशी?
मिळालेल्या माहितीनुसार, नेहा (वय 31) या रेल्वे विभागात कार्यरत आहेत. गुरुवारी त्यांची ड्युटी संपल्यानंतर त्या उल्हासनगर येथील घरी जाण्यासाठी लोकलने प्रवास करत होत्या. दुपारी सुमारे अडीच वाजता लोकल कल्याण रेल्वे स्थानकात येत असताना अचानक बाहेरून कोणीतरी लोकलच्या दिशेने दगड फेकला. हा दगड थेट नेहा धनगर यांच्या डोक्याला लागला.
advertisement
उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल
दगड लागल्यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या. लोकलमधील प्रवाशांनी तातडीने ही गोष्ट रेल्वे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर नेहा यांना तातडीने कल्याण येथील रेल्वे रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती आहे.
कारवाईची मागणी
या घटनेमुळे लोकल प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. धावत्या लोकलवर वारंवार होणाऱ्या दगडफेकीमुळे अनेकदा प्रवासी तसेच रेल्वे कर्मचारी जखमी होतात. अशा घटनांवर आळा घालण्यासाठी रेल्वे प्रशासनाने कठोर पावले उचलावीत तसेच संबंधित आरोपींचा शोध घेऊन कडक कारवाई करावी अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे
