मदतीच्या बहाण्याने सुरू झाली ओळख
मिळालेल्या माहितीनुसार,पीडित तरुणीची आरोपी सागर शिंदेशी जानेवारी 2024 मध्ये ओळख झाली होती.दरम्यान अभ्यासात मदत करण्याच्या बहाण्याने सागरने तिच्याशी मैत्री वाढवली आणि हळूहळू तिचा विश्वास स्वता:वरचा विश्वास निर्माण केला. 1 मे रोजी सागर या तरुणीच्या घरी गेला. त्यावेळी त्याने स्वतःसोबत आणलेल्या शीतपेयात गुंगीचे औषध मिसळले. ते शीतपेय पिल्यानंतर तरुणी बेशुद्ध झाल्याचा फायदा घेत सागरने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
advertisement
लग्नाचं स्वप्न दाखवून तरुणीला गप्प बसवण्याचा डाव
यानंतर आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून तरुणीची समजूत काढली. काही दिवसांनी म्हणजेच 11 मे रोजी सागरने पीडितेला ठाण्यातील त्याच्या मित्राच्या घरी नेले. तिथेही त्याने पुन्हा तिच्याशी जबरदस्तीने संबंध निर्माण केले. या घटनेनंतर दोन दिवसांनी आरोपीने पीडितेला धमकी दिली की तिचा आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करेल. या धमकीच्या जोरावर त्याने पुन्हा एकदा तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे तक्रारीत सांगितले आहे.
अखेर तरुणीने गाठले पोलिस ठाणे
सतत होत असलेल्या अत्याचार आणि धमक्यांमुळे मानसिक त्रास सहन न झाल्याने अखेर पीडित तरुणीने खडकपाडा पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरोधात बलात्कार, धमकी आणि संबंधित गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.
