पेट्रोल भरून घरी परतताना नियतीने गाठले
मंगेश वाघे हा जांभूळ परिसरात वास्तव्यास होता. शुक्रवारी दुपारी तो दुचाकीवरून पेट्रोल भरून आपल्या घरी परतत होता. त्याचवेळी समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेनंतर मंगेश थेट ट्रकच्या चाकाखाली सापडला.
अपघात इतका भीषण होता की मंगेशचा घटनास्थळीच मृत्यू झाला. परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
advertisement
अपघातप्रकरणी ट्रक चालक ताब्यात
या अपघातामुळे जांभूळ रोडवरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. परिसरातील नागरिकांकडून जांभूळ रोडवर वेगमर्यादा आणि वाहतूक नियंत्रणासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत आहे.
