पोलिसांच्या पायाखालची जमीनच हादरली
पोलिसांनी भक्तीच्या खून प्रकरणाचा तपास केला असताना त्यांच्या पायाखालची जमीनच हादरली. दुर्वास पाटील याने आधीही दोन खून केल्याचं पोलस तपासात समोर आलं आहे. दुर्वास पाटील याने पहिला खून 50 वर्षाच्या सीताराम वीर यांचा केला होता. तर दुसरा खून 28 वर्षांच्या राकेश जंगम याचा खंडाळा येथे केला होता, अशी माहिती देखील समोर आली होती.
advertisement
दुर्वासने दिली गुन्हाची कबुली
दुर्वास पाटील अटक झाल्यानंतर देखील घाबरला नव्हता. तो सराईत गुन्हेगारासारखा वागत असल्याने पोलिसांना त्याच्यावर संशय आला. त्यानंतर वाटद खंडाळा येथील एक बेपत्ता व्यक्ती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली गेली होती. या प्रकरणात पत्ता तरुणाचाही दुर्वास यानेच खून केल्याचं समोर आलं. पोलिसांनी चंद्र दाखवताच दुर्वासने गुन्हाची कबुली दिली. दुर्वास पाटील याने पहिला खून 50 वर्षीय सीताराम वीर यांचा केला. ते दुर्वास पाटीलच्या वडिलांच्या नावे असलेल्या सायली बारमध्ये कामाला होते.
दुर्वास पाटीलला पोलिसांनी अटक
दुर्वास पाटील याने मिरजोळे येथील भक्ती मयेकर या तरुणीबरोबर अनैतिक संबंध ठेवले. मात्र यात भक्ती अडथळा ठरत होती, त्यामुळे पाटीलने तिचा काटा काढला. भक्ती हिचा मृतदेह दोघा मित्रांच्या मदतीने आंबा घाटात नेवून दरीत फेकून दिला. भक्ती गायब झाल्याच्या तक्रारी नंतर 14 दिवसांनी तीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत दरीत आढळून आला. या प्रकरणात प्रमुख सूत्रधार असलेल्या दुर्वास पाटील याला पोलिसांनी अटक करुन चौकशी केली असता, त्याने भक्तीसह चार खून केल्याचे उघड झाले आहे.