रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे की प्रवाशांनी तिकीट काढताना या नवीन थांब्यांची माहिती तपासावी आणि त्यानुसार प्रवासाची योजना करावी तसेच या निर्णयामुळे कोकणातील प्रवाशांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे.
अनेक वर्षांनंतर प्रवाशांची मागणी अखेर मान्य
यापूर्वी अनेक गाड्या कोकणातून जात असल्या तरी सिंधुदुर्ग आणि कणकवली या मुख्य स्थानकांवर त्यांचा थांबा नव्हता. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता. प्रवासी संघटना आणि लोकप्रतिनिधींनी अनेक वेळा या थांब्यांची मागणी केली होती. अखेर रेल्वे प्रशासनाने ती मान्य केली आहे.
'या' एक्स्प्रेस गाड्यांना मिळाला थांबा!
advertisement
सिंधुदुर्ग स्थानकावर गाडी क्रमांक 12977/78 मरूसागर एक्स्प्रेस आणि गाडी क्रमांक 22655/56 एर्नाकुलम-हजरत निजामुद्दीन सुपरफास्ट एक्स्प्रेस यांना प्रत्येकी दोन मिनिटांचा थांबा देण्यात आला आहे तर कणकवली स्थानकावर गाडी क्रमांक 22475/76 हिसार-कोइंबतूर एसी सुपरफास्ट एक्स्प्रेस आणि गाडी क्रमांक 16335/36 गांधीधाम-नागरकोईल एक्स्प्रेस यांना थांबा देण्यात आला आहे.
कोणत्या गाडीला कधी थांबा मिळणार? संपूर्ण यादी जाहीर!
1)सिंधुदुर्ग स्थानक:
गाडी क्रमांक 12977 – 2 नोव्हेंबरपासून
गाडी क्रमांक 12978 – 7 नोव्हेंबरपासून
गाडी क्रमांक 22655 – 5 नोव्हेंबरपासून
गाडी क्रमांक 22656 – 7 नोव्हेंबरपासून
2)कणकवली स्थानक:
गाडी क्रमांक 22475 – 5 नोव्हेंबरपासून
गाडी क्रमांक 22476 – 8 नोव्हेंबरपासून
गाडी क्रमांक 16335 – 7 नोव्हेंबरपासून
गाडी क्रमांक 16336– 11 नोव्हेंबरपासून
