TRENDING:

मसाला वाटू दे म्हटलं म्हणून मुलानेच आईच्या डोक्यात घातला वरवंटा, रत्नागिरी हादरलं

Last Updated:

धावणेवाडीतील संतोष दिवाळे याने मसाला वाटण्याच्या कारणावरून आईवर दगडी वरवंट्याने हल्ला केला. सुनिताबाई गंभीर जखमी असून रुग्णालयात आहेत. संतोषवर गुन्हा दाखल.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
आईच्या मायेला मोल नसतं असं आपण म्हणतो, पण लांजा तालुक्यातील धावणेवाडी येथे एका मुलानं जे केलं ते पाहून संपूर्ण रत्नागिरी हादरलं आहे. ज्या आईने रक्ताचं पाणी करून मुलाला वाढवलं, त्याच मुलाने केवळ 'मसाला वाटून दे' असं सांगितल्याच्या रागातून ७० वर्षांच्या वृद्ध आईच्या डोक्यात दगडी वरवंटा घालून तिला रक्ताच्या थारोळ्यात पाडलं. इतकंच नाही तर, रागाच्या भरात स्वतःच्या शर्टानं आईचा गळा आवळून तिला ठार मारण्याचाही प्रयत्न केला.
News18
News18
advertisement

रविवारी सायंकाळी ७ च्या सुमारास ही धक्कादायक घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. ३५ वर्षांचा संतोष गणपत दिवाळे हा आवडीनं जेवणासाठी कोळंबी घेऊन घरी आला होता. वयाची सत्तरी ओलांडलेल्या त्याच्या आईनं, सुनिताबाईंनी, मुलासाठी ती कोळंबी आनंदाने साफ करून दिली. कोळंबी बनवण्यासाठी सुनिताबाईंनी संतोषला फक्त इतकंच सांगितलं की, "बाळा, जरा मसाला वाटून देतोस का?" पण या साध्याशा विनंतीनं संतोषचा पारा चढला.

advertisement

रागाच्या भरात आईचा गळा आवळला

मसाला वाटण्याच्या कारणावरून आई आणि मुलामध्ये शाब्दिक चकमक सुरू झाली. पण हा वाद इतक्या थराला गेला की, संतोषच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्याने जवळच असलेला जड दगडी वरवंटा उचलला आणि थेट आपल्या आईच्या डोक्यात घातला. आई रक्ताच्या थारोळ्यात कोसळली असतानाही त्याचा राग शांत झाला नाही. त्याने स्वतःच्या शर्टाचा फास करून आपल्या जन्मदात्रीचा गळा आवळला.

advertisement

रुग्णालयात मृत्यूशी झुंज

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
तोटा झाला तरी निर्णय घेतला, टरबूज लागवड ठरली फायद्याची, 8 लाखांचा नफा
सर्व पहा

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सुनिताबाईंना तातडीने लांजा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने प्राथमिक उपचारानंतर त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सुनिताबाई सध्या तिथे मृत्यूशी झुंज देत आहेत. याप्रकरणी लांजा पोलिसांनी नराधम मुलगा संतोष दिवाळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

advertisement

मराठी बातम्या/कोकण/
मसाला वाटू दे म्हटलं म्हणून मुलानेच आईच्या डोक्यात घातला वरवंटा, रत्नागिरी हादरलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल