TRENDING:

विद्येच्या मंदिरात हे चाललंय काय? शाळेत शिक्षकाचं विद्यार्थ्यासोबत अमानुष कृत्य; Shocking Video Viral

Last Updated:

एका शाळेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
विशाल रेवडेकर/सिंधुदुर्ग : शाळा म्हणजे विद्येचं मंदिर पण याच विद्येच्या मंदिरात शिक्षक विद्यार्थ्यासोबत अमानुष कृत्य करताना दिसले. एका शाळेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. ज्यात शिक्षकांनी विद्यार्थ्यासोबत जे केलं ते पाहून पालकांनी संताप व्यक्त केला आहे.
शिक्षकाची विद्यार्थ्याला मारहाण
शिक्षकाची विद्यार्थ्याला मारहाण
advertisement

सिंधुदुर्गच्या कुडाळ तालुक्यातील हा धक्कादायक प्रकार आहे. शाळेत वर्गात शिक्षक विद्यार्थ्याला अमानुष मारहाण करताना दिसले. शिक्षकांनी विद्यार्थ्याला सुरुवातीला डोक्यावर, नंतर पाठीवर मारलं. पुढे तर त्यांनी हद्दच ओलांडली. त्यांनी विद्यार्थ्याचा गळाच आवळला. हा धक्कादायक प्रकार असून सध्या या त्या शिक्षकाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली जाते आहे.  शिक्षक रागाने त्या विद्यार्थ्याला मारत असून त्या विद्यार्थ्याचा गळादेखील आवळताना दिसत आहे. त्यामुळे शिक्षकावर कारवाईची मागणी सध्या जोर धरू लागली आहे.

advertisement

मंदिराच्या पुजाऱ्याला लुटलं पण नंतर घडला 'चमत्कार'; 2 तासांत परत मिळाले त्याचे 12 लाख

जेवणावेळी हातात लाडू दिसल्याने शिक्षकाची विद्यार्थ्याला भयानक शिक्षा

याआधी जानेवारीत  पालघर जिल्ह्यातीस एका शासकीय आश्रम शाळेत एका विद्यार्थ्याला दोन लाडू घेतले म्हणून शिक्षकाने बेदम मारहाण केली होती.. मोखाडा तालुक्यातील जव्हार आदिवासी प्रकल्पा अंतर्गत येणाऱ्या कारेगाव शासकीय आश्रम शाळेत हा प्रकार उघडकीस आला. नववीत शिकणाऱ्या रुद्राक्ष पागीला बेशुद्ध पडेपर्यंत शिक्षकाकडून मारहाण करण्यात आली. शिक्षकाविरोधात तक्रार करू नये म्हणून पालकांवरही दबाव टाकला जात असल्याचा रुद्राक्षाच्या आईचा आरोप आहे.

advertisement

रुद्राक्ष जेवण घेण्यासाठी गेला त्यावेळेस त्याच्या हातात दोन लाडू होते. याचा जाब विचारत रुद्राक्षला या शिक्षकाने बेदम मारहाण केली. ललित अहिरे या शिक्षकांनी ही मारहाण केल्याचं प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आलं आहे. मात्र, रुग्णालयात दाखल झाल्यानंतर शिक्षकांविरोधात तक्रार करू नये म्हणून पीडित विद्यार्थ्याच्या आई वडिलांवर शिक्षकांकडून दबाव आणला जात होता. या सगळ्या धक्कादायक घटनेमुळे शासकीय आश्रम शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

advertisement

Bangalore Video : मळालेले कपडे पाहून शेतकऱ्याला मेट्रोमध्ये चढू दिलं नाही, VIDEO ने खळबळ

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
अतिवृष्टीचा फटका, बबन यांच्या सीताफळाचे मोठं नुकसान, खर्च निघणे झालं अवघड
सर्व पहा

(सूचना - व्हिडीओ संवेदनशील असल्याने तो दाखवण्यात आला नाही.)

मराठी बातम्या/कोकण/
विद्येच्या मंदिरात हे चाललंय काय? शाळेत शिक्षकाचं विद्यार्थ्यासोबत अमानुष कृत्य; Shocking Video Viral
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल