TRENDING:

गरीब रुग्णांचा 'देव' हरपला! गेली 50 वर्षे फक्त 2 रुपयांत उपचार करणाऱ्या डॉक्टरचा मृत्यू, आजाराने घेतला जीव

Last Updated:

2 Rupees doctor died : त्यांना जनतेचा डॉक्टर आणि दोन रुपयांचा डॉक्टर या नावाने ओळखलं जायचं. त्यांच्या निधनाने फक्त त्यांच्या कुटुंबावरच नव्हे तर कित्येक गरीब रुग्णांवर दुःखाचा डोंगरच कोसळला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
तिरुवनंतपुरम : 2 रुपयांत काय येतं... फक्त एक साधं चॉकलेट... पण फक्त या 2 रुपयात एक डॉक्टर रुग्णांना उपचार देतो, हे सांगितलं तर साहजिकच कुणाला विश्वास बसणार नाही. असा डॉक्टर म्हणजे माणसातला खरा देवच. गरीब रुग्णांचा आधारच... असाच 2 रुपयांत रुग्णांवर उपचार करणारा डॉक्टर, ज्याच्या मृत्यूची बातमी समोर आली आहे.
News18
News18
advertisement

डॉक्टरकडे जायचं म्हटलं की पैसे कसे जातात कळतच नाही. डॉक्टरांना फक्त भेटायचं म्हटलं तरी हजारो रुपये फी असते. पण या काळातही रुग्णांवर फक्त 2 रुपयात उपचार करणारा एक डॉक्टर, थोडीथोडकी नव्हे तर तब्बल 50 वर्षे या डॉक्टराने रुग्णांवर फक्त 2 रुपयांतच उपचार केले. गरीब रुग्णांसाठी हा डॉक्टर म्हणजे देवच. गरीबांचा हाच देव हरपला आहे. गेली 50 वर्षे फक्त 2 रुपयांत उपचार करणाऱ्या डॉक्टरचा मृत्यू झाला आहे.

advertisement

बाबो! प्रसिद्ध अभिनेत्रीच्या फक्त तोंडाचाच 16 कोटींचा विमा, असं तिच्या तोंडात आहे तरी काय?

केरळच्या कन्नूर डॉक्टर ए. के. रायरू गोपाल. वयाच्या 80 व्या वर्षी त्यांचं निधन झालं आहे. वृद्धापकाळातील आजाराने त्यांचा जीव घेतला आहे. त्यांना जनतेचा डॉक्टर आणि दोन रुपयांचा डॉक्टर या नावाने ओळखलं जायचं.

डॉ. गोपाल यांनी त्यांच्या लक्ष्मी या घरातच क्लिनिक सुरू केलं होतं. जिथं ते पहाटे चार ते दुपारी चारपर्यंत रुग्णांवर उपचार करत होते. त्यांच्या क्लिनिकमध्ये दररोज शेकडो रुग्ण उपचारासाठी येत असत. त्यांची काही दिवसांपासून आजारी होते. त्यांची तब्येत ढासळत होती. त्यामुळे मागील काही वर्षे त्यांनी क्लिनिकची वेळ सकाळी 6 ते दुपारी 4 केली होती. पण नंतर वाढत्या आजारपणामुळे त्यांना मे 2024 मध्ये क्लिनिक बंद करावं लागलं होतं. आता तेसुद्धा या जगात राहिले नाहीत.

advertisement

मृत बहिणीची अंगठी तरुणीने स्वतःकडे ठेवली, भावाने ती गर्लफ्रेंडला दिली, नंतर घडलं असं की...

डॉक्टर ए. के. रायरू गोपाल यांच्या निधनाने फक्त त्यांच्या कुटुंबावरच नव्हे तर कित्येक गरीब रुग्णांवर दुःखाचा डोंगरच कोसळला आहे. त्यांच्या त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी आहे. त्यांच्या जाण्याने  या भागातील गरीब रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

advertisement

केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी डॉ. गोपाल यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. 'अर्ध शतक त्यांनी रुग्णांवर केवळ 2 रुपयांत उपचार केले. जनतेची सेवा करण्याच्या त्यांच्या इच्छेने रुग्णांना मोठा दिलासा मिळत होता. त्यांच्या मृत्यूने समाजाची मोठी हानी झाली आहे', असं त्यांनी म्हटलं आहे.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
गरीब रुग्णांचा 'देव' हरपला! गेली 50 वर्षे फक्त 2 रुपयांत उपचार करणाऱ्या डॉक्टरचा मृत्यू, आजाराने घेतला जीव
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल