स्वस्त असतानाही बनावट कोबी बाजारात का ?
आधी सांगितल्याप्रमाणे कोबी ही वर्षभर मिळणारी एक स्वस्त भाजी आहे. त्यामुळे बनावट प्लास्टिकचा कोबी तयार करून काय मिळणार ? असा प्रश्न आपल्यासारख्या अनेकांना पडतो. त्यामुळे अनेक जण कोबी खरेदी करताना नीट पाहात नाहीत किंवा बाजारात मिळणारा कोबी हा बनावट कोबी नाही असं मानूनच खरेदी करतात. हीच मानसिकता लक्षात घेऊन पैशांच्या मागे लागलेल्या व्यक्ती किंवा देशविघातक कृत्य करण्याची मानसिकता असलेल्या व्यक्ती बनावट प्लास्टिकचा कोबी बनवतात. आजकाल सगळ्याच हॉटेलपासून चायनिज स्टॉलपर्यंत कोबीचा वापर होतो. त्यामुळे प्लास्टिकचा किंवा बनावट कोबी खाल्याल्याने पोटदुखी, गॅस आणि अपचन यासारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे तुम्ही बाजारातून विकत घेत असलेला कोबी अस्सल आणि खरा असणं क्रमप्राप्त ठरतं.
advertisement
जाणून घेऊयात तुम्ही खरेदी करत असलेला कोबी हा खरा आहे की खोटा हे ओळखण्याच्या 5 सोप्या टिप्स
1) पानांची रचना : खऱ्या कोबीची पानं नैसर्गिकरित्या थोडीशी वळलेली आणि जाड असतात, तर बनावट कोबीची पानं चमकदार असतात. त्यांना हात लावल्यानंतर प्लास्टिकसारखी दिसतात.
2) वास : खऱ्या कोबीला मातीचा आणि ताज्या भाज्यांचा वास येतो, तर बनावट कोबीला रासायनिक किंवा प्लास्टिकसारखा वास येऊ शकतो.
3) कापून तपासा : जेव्हा खरा कोबी कापला जातो तेव्हा तो आतून हलक्या पांढऱ्या रंगाचा दिसतो, तर बनावट कोबी आतून खूप चमकदार हलक्या, हिरव्या रंगाचा किंवा प्लास्टिकसारखा दिसू शकतो.
4) गरम पाणी : खरा आणि बनावट कोबी ओळखण्यासाठी, गरम पाण्याची चाचणी करता येऊ शकते. कोबी गरम पाण्यात टाकताच तो जर बनावट किंवा प्लॅस्टिकचा असेल तर तो मऊ पडेल किंवा आकसून जाईल.
5) जाळून पाहा : खऱ्या कोबीची पाने सहज जळतात, तर बनावट कोबीची पाने सहज जळत नाहीत. किंवा जळली तरीही त्याला प्लास्टिकचा दुर्गंध आणि काळसरपणा दिसून येतो.