वजन कमी करण्यासाठी अनेक जण अनेक प्रयत्न करतात. मात्र हा आनंद काही दिवसांसाठीच टिकतो. कारण वजन कमी झालं म्हणून अनेकजण पुन्हा व्यायाम करायचा कंटाळा करतात, याचा दुष्परिणाम असा होतो की तुम्ही जितकं वजन घटवता त्याच्या दुप्पट वजन हे पुन्हा वाढतं. त्यामुळे तुम्हाला सपाट पोट, शिडशिडीत बांधा हवा असेल प्रयत्नपूर्वक मेहनत करावी लागेल. जेणेकरून तुम्ही निरोगी राहू शकता.
advertisement
जीना अमीन, जी एक पर्सनल फिटनेस कोच आहे तिने नुकतीच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट करून तिच्या वजन कमी करण्याच्या प्रवासाची माहिती दिलीये. तिने वजन कमी करण्याच्या आणि कमी केलेलं वजन दीर्घकाळ कायम ठेवण्याच्या टिप्सही दिल्या आहेत.
जीनाने तिच्या व्हिडिओला नाव दिलंय. सपाट पोट - एक प्रवास. ती पुढे म्हणते, ‘प्रत्येक महिला,तरूणीला वाटतं की तिचं पोट हे सपाट असलं पाहिजे. तुम्हालाही सपाट पोट हवं असेल तर मी सांगते ते प्रयत्न करून पाहा. लक्षात ठेवा सपाट पोट तुम्हाला एका रात्रीत मिळणार नाही. त्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागेल.ज्यासाठी दररोज थोडे प्रयत्न, सातत्य आणि संयमाची गरज आहे.’
जाणून घेऊयात जीनाने आमिनने पोटावरची चरबी कमी करण्यासाठी आणि घटवलेलं वजन दीर्घकाळ टिकवण्यासाठी पोस्टमध्ये कोणत्या टिप्स दिल्या आहेत ते.
1) कॅलरीयुक्त ड्रिंक्स पिऊ नका :
कोल्डड्रिंक्स, अल्कोहोल, हिरव्या रंगाचे ज्यूस, काही विशिष्ट स्मूदीज यामध्ये कॅलरीज भरपूर असतात. यामुळे तुमची भूक मरत नाही तर जास्त वाढते. त्यामुळे कोणत्या पाणी पिणं हे जास्त फायद्याचं ठरतं.
2) डाएट कंट्रोल :
डाएट करणं म्हणजे उपाशी राहणं असं नाही. योग्य वेळी योग्य पदार्थ खाणं, तुमच्या आहारात प्रोटिन्स, खनिजं असलेलं अन्नपदार्थ, फायबर्स आणि व्हिटॅमिन्स असलेली फळं खा. आहारातून कार्बोहाड्रटेस, कॅलरीज यांचं प्रमाण कमी करा. याशिवाय तुम्ही तुमचे आवडते पदार्थ नक्कीच खाऊ शकता. पण त्यांचं खाण्याचं प्रमाण कमी करा.
3) कमी खा :
जेव्हा तुम्हाला वजन कमी करायचं असतं तेव्हा तुम्हाला कमी खाऊन शरीरात साठून राहिलेल्या कॅलरीज बर्न करण्याची आवश्यकता असते. त्यामुळे व्यायाम आणि संतुलित आहार घ्यायला सुरूवात करा.
4) खाण्याबाबत सतर्क राहा :
जेव्हा तुम्हाला भूक लागेल तेव्हा पाणी प्या. आपल्याला खाण्याच्या लागलेल्या सवयीमुळे जास्त खाण्याची सवय लागलेली असते. ही सवय तोडण्याचा प्रयत्न करा.
5) सातत्य आणि संयम ठेवा :
आधी सांगितल्या प्रमाणे वजन एका दिवसात कमी होत नाही. त्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांची आवश्यकता आहे. त्यामुळे काही दिवस व्यायाम करून वजन कमी झालं नाही तर हार न मानता तुमच्या प्रयत्नात वाढ करून त्यात सातत्य ठेवा.