अनेकांना डोक्यावरचे केस गळायला लागले की काळजी वाटते. मात्र केस गळणं हे सामान्य असतं. दररोज काही प्रमाणात केस गळत असतील तर त्यात घाबरण्याचं कारण नसतं. मात्र केस खूप जास्त गळत असतील, ते नक्कीच काळजीचं कारण असू शकतं. एका व्यक्तीचे दररोज अंदाजे 50 ते 100 केस गळतात. हे केस गळतात व तिथे नवे केस उगवू लागतात. यामुळे केसांचं संतुलन राहतं. यामुळे केस पातळ होणं किंवा टक्कल पडण्याची समस्या उद्भवत नाही.
advertisement
केस गळणं असामान्य असल्याची काही लक्षणं आहेत. केस धुताना जास्त केस गळत असतील किंवा उशीवर खूप केस पडलेले दिसत असतील, तर ते सामान्य केस गळणं नसतं. केस पातळ झाले असतील व डोक्याच्या वरच्या भागात केस कमी झाले असतील, तर ते असामान्य केसगळतीचं लक्षण समजावं. केसांमधला भांग जास्त रुंद झाला, तर हेही असामान्य केसगळतीचं एक लक्षण असतं. काही वेळेला डोक्याची त्वचा खराब राहिल्यानं किंवा कोंडा झाल्यामुळे केस गळू लागतात.
तुमच्या जवळपास असलेल्या या झाडात लपलंय सौंदर्य, फायदे पाहून चाटच व्हाल!
केसगळतीबरोबरच डोक्याच्या त्वचेवर आणि केस गळले, तिथे वेदना होत असतील, तर हे गंभीर असू शकतं. तुमचे केस कोरडे, रूक्ष झाले असतील तसंच ते सहज तुटत असतील, तर यामुळे केस गळतात व ते असामान्य असू शकतं. अशा प्रकारे केस गळण्याची अनेक कारणं असतात.
बरेचदा केस पातळ होणं आणि टक्कल पडणं या समस्या आनुवंशिकतेमुळे उद्भवतात. काही हार्मोन्समध्ये बदल झाल्यामुळे केस गळू शकतात. पीसीओएस, गरोदरपणा आणि रजोनिवृत्तीमध्ये केस गळण्याचं प्रमाण जास्त असू शकतं. काही आजारांमुळेदेखील केसगळती होते.
थायरॉईड, ऑटोइम्युन डिसीज किंवा काही पोषणमूल्यांची कमतरता झाल्यामुळे केस गळू शकतात. उच्च रक्तदाब, कॅन्सर किंवा डिप्रेशनवर उपचार घेणाऱ्या व्यक्तींनाही केस गळण्याची समस्या भेडसावू शकते. खूप जास्त ताण असेल, तर टेलोजन एफ्लुवियम ही केसांची समस्या उद्भवू शकते. केस सतत घट्ट बांधून ठेवल्यानं किंवा केस वळवून बांधून ठेवल्यानं देखील गळू शकतात. केसगळतीची ही समस्या ओळखून त्यावर उपचार घेतले पाहिजेत. यामुळे केसांचं आरोग्य चांगलं राहू शकतं.