केस गळती थांबवायची असेल तर तुम्ही काही गोष्टी एकत्र करून त्याच मिश्रण शॅम्पू सोबत केसांना लावू शकता ज्यामुळे केसांना फायदा होऊ शकतो. हे मिश्रण केसांवर लावल्याने केस गळण्याची थांबतील, मजबूत होतील आणि केस वाढण्यास मदत होईल.
'या' गोष्टींनी बनवा अँटी हेअर शॅम्पू :
एक कांदा
एक चमचा तांदूळ
एक चमचा लवंग
advertisement
दोन तेजपत्ता
एक कप पाणी
कसं बनवाल मिश्रण?
एका पॅनमध्ये एक कप पाणी टाका आणि त्यात कांद्याचे तुकडे टाका. मग त्यात तांदूळ, लवंग आणि तेजपत्ता टाकून दहा मिनिटे गॅसवर उकळवा. दहा मिनिट हे मिश्रण थंड होऊ द्या. ज्यामुळे तेजपत्ता, लवंग आणि कांदा यांचे तत्व त्या मिश्रणात उतरेल. मग हे पाणी नीट चाळून घ्या आणि एका बॉटलमध्ये ओतून घ्या.
जेवणात तिखट खूप जास्त पडलंय? शेफ पंकजने सांगितलेली भन्नाट ट्रिक ठरेल उपयोगी
कॉफी पावडर मिक्स करा :
तयार केलेल्या मिश्रणात तुम्ही एक चमचा कॉफी पावडर मिक्स करा. मग या मिश्रणात बेबी शॅम्पू मिक्स करा. आठवड्यातून दोन वेळा तुम्ही या शॅम्पूने केस स्वच्छ धुवून घ्या. कांद्यात असलेलं सल्फर केस गळणं थांबवते, तेजपत्ता आणि लवंग केसांमध्ये फंगस आणि बॅक्टेरिया होण्याला रोखतात. तांदळाचे पाणी केसांना शाईन आणण्यासाठी तसेच केसांची ग्रोथ वाढण्यासाठी उपयोगी ठरते.