तुमची त्वचा नेहमी तरुण, चमकणारी आणि मुलायम राहावी, असं तुम्हाला वाटते का? मग आज तुम्हाला आम्ही अशा फळांबाबत सांगणार आहोत, जी रोज खाण्यासोबतच त्यांच्या सालीचा उपयोगही तुमच्या त्वचेची निगा राखण्यासाठी होईल. अशी काही फळं आहेत, जी केवळ चवीलाच अप्रतिम नाहीत तर आरोग्य आणि त्वचा या दोन्हींसाठी खूप फायदेशीर आहेत. या फळांच्या सालींमुळे तुमच्या चेहऱ्याचं सौंदर्य अनेकपटींनी वाढू शकतं. या फळाच्या सालीमध्ये असे गुणधर्म असतात, जे तुमच्या त्वचेच्या समस्या दूर करतात.
advertisement
सफरचंद :
सफरचंद हे एक स्वादिष्ट आणि निरोगी फळ आहे. सफरचंदाच्या सालीमध्ये असे अनेक गुणधर्म आढळतात, जे चेहऱ्याचं सौंदर्य वाढवतात. सफरचंदाच्या सालीमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि अँटिएजिंग गुणधर्म असतात. हे त्वचेच्या पेशींचं नुकसान होण्यापासून संरक्षण करतात, व त्यांना निरोगी ठेवतात. सफरचंदाची साल बारीक करून फेस पॅक म्हणून चेहऱ्यावर लावल्यानं सुरकुत्या कमी होऊ लागतात. त्वचा टवटवीत आणि तरुण राहण्यास यामुळे मदत होते.
पपई :
पपई खाणं जितकं स्वादिष्ट आणि फायदेशीर आहे, तितकेच फायदे पपईची साल त्वचेवर लावण्याचे आहेत. पपईच्या सालीमध्ये पपेन हे नैसर्गिक एन्झाइम आढळते. हे एन्झाइम त्वचेतून मृत आणि खराब झालेल्या पेशी साफ करण्यास मदत करते. हे नवीन आणि निरोगी पेशींच्या निर्मितीस देखील प्रोत्साहन देतं. पपईची साल बारीक करून चेहऱ्यावर लावल्यानं डाग हळूहळू नाहीसे होतात, त्वचा मुलायम आणि चमकदार होते. पपईच्या सालीचा नियमित वापर केल्यास त्वचेशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळू शकते.
Almond : एका दिवसात किती बदाम खावेत 5 की 10? जाणून घ्या बदाम खाण्याची योग्य पद्धत आणि फायदे
संत्री :
संत्री खाणं खूप फायदेशीर आहे. त्यात व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स, फायबर इत्यादी अनेक पोषक घटक आढळतात. यामुळे शरीराला हायड्रेट ठेवण्यासोबतच रोगप्रतिकारशक्ती वाढते. याशिवाय संत्र्याची साल चेहऱ्यावर लावल्यानं त्वचेसाठी फायदा होतो. या सालीमध्ये व्हिटॅमिन सी आणि सायट्रिक अॅसिड असते, जे त्वचेसाठी अँटिऑक्सिडंट म्हणून काम करते. त्यामुळे सुरकुत्या कमी होण्यास आणि त्वचा चमकदार होण्यास मदत होते.
केळी :
केळी खाण्याचे फायदे तुम्हाला माहिती असतीलच, पण केळीच्या सालीचे देखील खूप फायदे आहेत. पिकलेल्या केळीची सालीची पेस्ट तयार करून ती पेस्ट चेहऱ्यावर आणि हातावर लावा. काही वेळानं ही पेस्ट सुकल्यावर कोमट पाण्यानं स्वच्छ करा, आणि हलक्या हातांनी मसाज करा. असं सातत्यानं केल्यानं तुमची त्वचा मऊ, कोमल आणि चमकदार राहील. केळीच्या सालीमध्ये व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि झिंक सारखे घटक असतात, ज्यामुळे त्वचा निरोगी राहते. त्यामुळे केळीच्या सालीनं चेहरा आणि त्वचा या दोन्हींचे सौंदर्य वाढवता येतं.
दरम्यान, त्वचा निरोगी ठेवण्यासाठी विविध फळांच्या सालीचा उपयोग होतो. पण त्यांचा योग्य वापरही करणे तितकचं महत्त्वाचं आहे.
