Almond : एका दिवसात किती बदाम खावेत 5 की 10? जाणून घ्या बदाम खाण्याची योग्य पद्धत आणि फायदे
- Published by:Pooja Pawar
Last Updated:
आयुर्वेदिक डॉक्टर दिक्षा भावसार यांनी बदाम खाण्याचे फायदे, खाण्याची योग्य पद्धत इत्यादींविषयी माहिती शेअर केली आहे. तसेच एका व्यक्तीने दिवसभरात किती बदाम खाल्ले पाहिजेत याविषयी देखील सांगितले आहे.
मुंबई : ड्रायफ्रूट्सपैकी बदाम हा सर्वात जास्त खाल्ला जाणारा ड्रायफ्रूट आहे. बदामामध्ये व्हिटॅमिन ई, मैग्नीशियम, राइबोफ्लेविन, कॉपर, आयरन, पोटॅशियम, झिंक, व्हिटॅमिन बी, नियासिन, थियामिन, फोलेट यासारखे पौष्टिक घटक आढळतात. आयुर्वेदिक डॉक्टर दिक्षा भावसार यांनी बदाम खाण्याचे फायदे, खाण्याची योग्य पद्धत इत्यादींविषयी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर माहिती शेअर केली आहे. तसेच एका व्यक्तीने दिवसभरात किती बदाम खाल्ले पाहिजेत याविषयी देखील सांगितले आहे.
दररोज बदामाचे सेवन करणे हे आरोग्यासाठी चांगले असले तरी दिवसाला किती आणि कसे बदाम खावेत याविषयी जाणून घेणे देखील तितकेच महत्वाचे आहे. आयुर्वेदिक डॉक्टर दीक्षा भावसार सांगतात की जर तुम्ही दररोज बदाम खाण्याची सवय लावत असाल तर सुरुवातीला तुम्ही केवळ 2 बदाम पाण्यात भिजवून आणि त्याची साल काढून खात जा. जेव्हा तुम्हाला 10 दिवस दोन बदाम खाण्यास सोयीस्कर वाटतं असेल आणि पचनास कोणताही त्रास होत नसेल तेव्हाच तुम्ही दिवसाला 5 बदाम खाणे सुरु करू शकता.
advertisement
5 भिजवलेले आणि सोललेले बदाम जर तुम्ही सलग 21 दिवस खात असाल आणि तुम्हाला पोट फुगणे, जुलाब किंवा पचनाशी संबंधित कोणत्याही समस्या जाणवत नसतील तर दररोज बदाम खाण्याची संख्या 10 पर्यंत वाढवू शकता. सलग तीन महिने जर तुम्ही रोज 10 बदाम खात असाल तर यानंतर तुम्ही हे प्रमाण दररोजचे 12, 15, 18 ते 20 बदाम खाण्यापर्यंत वाढवू शकता. ज्या लोकांची पचनशक्ती चांगली आहे, जे रोज व्यायाम करतात अशा व्यक्ती दररोज 20 बदाम खाऊ शकतात. जर तुम्हाला सूज येणे, जुलाब, बद्धकोष्ठता, पचनाशी संबंधित समस्या असतील तर अश्या व्यक्तींनी बदामाचे सेवन करू नये.
advertisement
बदाम खाण्याचे फायदे :
नियमित बदाम खाल्ल्याने महिलांमधील पिरीएड्स क्रॅम्पची समस्या कमी होते. बदाम खाल्ल्याने पचनशक्ती सुधारते आणि पोट फुगणे कब्ज सारख्या समस्या दूर होतात. बदामातील पोषक तत्त्वांमुळे मेंदूचे आरोग्य सुधारतात आणि स्मरणशक्तीला चालना मिळते.बदामात अँटिऑक्सिडेंट्स आणि जीवनसत्त्वे भरपूर असल्याने ते त्वचा आणि केसांसाठी चांगले ठरतात. नियमित बदामाचे सेवन केल्याने हृदय निरोगी राहते आणि उच्च रक्तदाब तसेच कोलेस्ट्रॉलची समस्या कमी होते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 07, 2024 4:04 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Almond : एका दिवसात किती बदाम खावेत 5 की 10? जाणून घ्या बदाम खाण्याची योग्य पद्धत आणि फायदे









