डॉ. दांडगे यांच्या मते, दारू शरीरात गेल्यावर 'डिहायड्रेशन' (पाणी कमी होणे) प्रक्रिया सुरू होते. म्हणूनच त्यांनी एक सोपा नियम सांगितला आहे. दारूचा एक ग्लास पिऊन झाला की, लगेच एक ग्लास पाणी प्यावे. म्हणजेच दोन पेगच्या मध्ये पाण्याचे सेवन करणे अनिवार्य आहे. यामुळे शरीर हायड्रेट राहते आणि दुसऱ्या दिवशी होणारा डोकेदुखीचा त्रास किंवा हँगओव्हर कमी होतो.
advertisement
अनेकजण डायरेक्ट दारू पिण्यावर भर देतात, जे अत्यंत चुकीचे आहे.
काय करावे? दारू पिण्यापूर्वी काहीतरी हेल्दी खावे. जेव्हा तुम्ही आधीच थोडे हेल्दी पदार्थ खाता, तेव्हा तुमचे पोट भरलेले असते.
पोट भरलेले असल्यामुळे तुम्ही दारु कमी प्रमाणात करता आणि दारू थेट रक्तामध्ये शोषली जाण्याचा वेगही मंदावतो.
दारूचा सर्वात घातक परिणाम लिव्हरवर (यकृत) होतो. पण डॉ. प्रिया दांडगे यांनी यावर एक जबरदस्त उपाय सांगितला आहे. त्यांनी सुचवले आहे की, दारू पिताना किंवा त्यापूर्वी प्रोटिनयुक्त पदार्थ खावेत.
काय खावे काय खाऊ नये?
लो-फॅट पनीर, चीज, मोड आलेली कडधान्ये, बॉइल्ड चिकन किंवा ग्रील्ड चिकन. हे प्रोटिन लिव्हरसाठी एखाद्या संरक्षकासारखे काम करते. प्रोटिनमुळे अल्कोहोलचा थेट आणि तीव्र परिणाम लिव्हरवर होण्यापासून बचाव होतो.
सहसा दारू म्हटलं की आपण तळलेले पदार्थ, वेफर्स किंवा मसालेदार चखण्याला पसंती देतो. पण डॉक्टर सांगतात की, हे पदार्थ सोडून वरील हेल्दी प्रोटिनयुक्त पर्याय निवडणे शरीरासाठी जास्त हिताचे आहे.
डॉक्टरांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे की, दारू प्यायल्यानंतर लगेच जड जेवण करू नये. अनेकदा लोक दारु पूर्ण झाल्यावर खूप जास्त कॅलरी असलेले अन्न खातात, जे पचनासाठी जड जाते आणि लिव्हरवरचा ताण वाढवते.
कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा आरोग्यासाठी हानिकारकच असतो, हे विसरून चालणार नाही. तरीही, सामाजिक जीवनात मद्यप्राशन करताना जर आपण डॉ. प्रिया दांडगे यांनी सांगितलेल्या या नियमांचे पालन केले, तर शरीराला होणारा संभाव्य धोका आपण नक्कीच कमी करू शकतो.
(टीप: हा लेख केवळ माहितीसाठी आहे. मद्यपान करणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. वरील टिप्स केवळ होणारा अपाय कमी करण्यासाठी सुचवण्यात आल्या आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
