मेरठ (उत्तर प्रदेश): आजकाल आपण बाजारहाट करून आल्यावर सगळ्या भाज्या- फळं फ्रीजमध्ये ठेवून देतो. अधिक काळ चांगली राहावीत हा उद्देश असला तरी हे दर वेळी काही खरं नसतं. भाज्या फ्रिजमध्ये ठेवतर सावधान! अनेक भाज्या थंड तापमानात पोषक द्रव्ये गमावतात आणि लवकर खराब होतात. इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. महेश कुमार बन्सल यांच्या मते, काही भाज्या फ्रीजमध्ये न ठेवता मोकळ्या हवेशीर जागी ठेवल्याने त्यांची चव आणि टेक्चर तर कायम राहतेच, शिवाय आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. चला जाणून घेऊया कोणत्या भाज्या फ्रीजमध्ये ठेवू नयेत.
advertisement
टोमॅटो
टोमॅटो फ्रिजमध्ये ठेवल्याने चव आणि टेक्चर खराब होतं. थंड तापमानामुळे टोमॅटोच्या उती तुटतात, ज्यामुळे फळ कडक आणि चवहीन होतं, तसेच त्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स नष्ट होतात.
बटाटे
बटाटे फ्रिजमध्ये ठेवल्याने त्याच्या स्टार्चचे साखरेत रूपांतर होते, ज्यामुळे त्याची चव गोड आणि पोत दाणेदार होते. त्यामुळे चवीवर परिणाम तर होतोच, शिवाय बटाट्याचे पोषणमूल्यही कमी होते.
कांंदा
कांदा फ्रिजमध्ये ठेवल्याने ते मऊ होतो आणि लवकर सडतो.
लसूण
लसूण फ्रिजमध्ये ठेवल्यास त्याचा वास आणि चव नष्ट होऊ शकते, ते लवकर अंकुरित होऊ शकताात आणि बुरशीचा धोका वाढतो.
काकडी
काकडी फ्रिजमध्ये ठेवल्याने तिच्या सालीवर पाणी साचते, ज्यामुळे ती लवकर खराब होते. थंड तापमानामुळे काकडीचा पोत मऊ होतो, ज्यामुळे ताजेपणा हरवतो.
काही हिरव्या भाज्या थंड तापमानात संवेदनशील असतात, रेफ्रिजरेट केल्यास त्यांची नैसर्गिक चव, पोत आणि पोषक द्रव्ये नष्ट करू शकतात. फ्रिजमधील ओलावा कांदा, लसूण आणि इतर भाज्या खराब करण्याचे काम करतो. यामुळे त्यांचे शेल्फ लाइफ कमी होते आणि त्यांच्या पोषक घटकांचे नुकसान होते.