दिवाळीच्या आनंदात प्रतिकारशक्ती चांगली ठेवण्यासाठी एक उपयुक्त आयुर्वेदिक पर्याय पाहूयात. आयुर्वेदात हळद आणि आवळा दोन्ही औषधी मानले जातात. हळदीतील करक्यूमिन हे एक शक्तिशाली दाहक-विरोधी आणि अँटिऑक्सिडंट घटक आहे, तर आवळ्यात असलेलं व्हिटॅमिन सी नैसर्गिक टॉनिक आहे.
सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यासोबत हे दोन्ही मिसळून प्यायल्यानं शरीराची रोगप्रतिकारक शक्ती सुधारते आणि पचन, त्वचा आणि केसांचं आरोग्य देखील सुधारतं. हा एक सोपा पण अत्यंत प्रभावी घरगुती उपाय आहे. हे पाणी दररोज प्यायल्यानं दीर्घकाळ निरोगी राहण्यासाठी मदत होऊ शकते. जाणून घेऊयात याचे आठ मुख्य फायदे.
advertisement
Health : केवळ दिवाळीत नाही एरवीही सकाळी लवकर उठा, आरोग्यासाठी ठरेल उत्तम
रोगप्रतिकारक शक्ती - आवळ्यातील व्हिटॅमिन सी आणि हळदीतील करक्यूमिन एकत्रितपणे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात. यामुळे शरीराला हंगामी आजार आणि विषाणूजन्य संसर्गांशी लढण्यास मदत होते.
शरीराला विषमुक्त करण्यासाठी उपयुक्त - हळद आणि आवळा हे मिश्रण यकृताचं कार्य सुधारतं आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढतं, ज्यामुळे त्वचा ताजी आणि टवटवीत वाटते.
वजन कमी करण्यासाठी उपयुक्त - या पेयामुळे चयापचयाचा वेग वाढतो आणि चरबी जाळण्याची प्रक्रिया सक्रिय होते. यामुळे भूक देखील कमी लागते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
पचनसंस्था मजबूत करण्यासाठी उपयुक्त - सकाळी रिकाम्या पोटी हे पेय प्यायल्यानं गॅस, आम्लता आणि अपचन यासारख्या समस्या कमी होतात आणि पचन सुधारतं.
त्वचा - अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी मुळे त्वचा डिटॉक्सिफाय होते, सुरकुत्या कमी होतात आणि चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते.
Diwali : दिवाळीत फिटनेससाठी काय करायचं ? वाचा खास दिवाळी डाएट टिप्स
सांधेदुखीपासून आराम मिळतो - हळदीचे दाहक-विरोधी गुणधर्म सांधेदुखी आणि संधिवात यापासून आराम देतात.
रक्तातील साखरेचं नियंत्रण - या पेयामुळे इन्सुलिन संवेदनशीलता सुधारते आणि रक्तातील साखरेचं संतुलन राखण्यास मदत होते, हे पेय मधुमेहींसाठी फायदेशीर आहे.
केसांचं आरोग्य - आवळ्यामुळे केसांच्या मुळांना पोषण मिळतं आणि केस गळती कमी होते, तर हळदीमुळे टाळू स्वच्छ आणि निरोगी राहतो.
हळद आणि आवळा यांचे मिश्रण हे एक नैसर्गिक आरोग्य टॉनिक आहे. दररोज सकाळी रिकाम्या पोटी ते प्यायल्यानं शरीर आतून मजबूत होतंच, शिवाय तुमचं एकूण आरोग्यही सुधारतं.