Diwali : सणासुदीच्या काळातही राहा तंदुरुस्त, या खास टिप्स लक्षात ठेवा, दिवाळी आनंदात साजरी करा

Last Updated:

तुम्हालाही दिवाळीनंतर वाढत्या वजनाची चिंता वाटत असेल तर, पाच सोप्या आणि प्रभावी टिप्स नक्की वापरा. या लेखात दिलेल्या टिप्स वापरल्या तर जास्त खाणं टाळता येईल.

News18
News18
मुंबई : दोन दिवसांत दिवाळी सुरु होईल, अनेकदा सणासुदीच्या काळात, आपण आपल्या आवडत्या पदार्थांचा आस्वाद घेत जास्त खातो, ज्यामुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होतो.
तुम्हालाही दिवाळीनंतर वाढत्या वजनाची चिंता वाटत असेल तर, पाच सोप्या आणि प्रभावी टिप्स नक्की वापरा. या लेखात दिलेल्या टिप्स वापरल्या तर जास्त खाणं टाळता येईल.
जाणीवपूर्वक खा - ही सर्वात महत्वाची टीप आहे. जेवताना केवळ अन्नावर लक्ष केंद्रित करा. टीव्ही किंवा मोबाईल फोन पाहत असताना जेवू नका. अन्न हळूहळू चावा आणि त्याची चव चाखा. यामुळे तुमच्या मेंदूला पोट लवकर भरल्याचे संकेत दिले जातील आणि गरजेपेक्षा जास्त खाणं टाळता येईल.
advertisement
पाणी पिणं - आपण अनेकदा तहान आणि भूक यांचा गोंधळ करतो. म्हणून, जेव्हा तुम्हाला भूक लागेल तेव्हा प्रथम एक ग्लास पाणी प्या. जेवणाच्या वीस-तीस मिनिटं आधी एक ग्लास पाणी प्यायल्यानं तुम्हाला कमी खाण्यास मदत होईल. पाण्यामुळे पचन सुधारण्यास आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत होईल.
advertisement
लहान ताट वापरा - ही एक मानसिक युक्ती आहे. लहान ताटात अन्न वाढल्यानं तुमच्या मेंदूला असं वाटतं की तुम्ही जास्त खाल्लं आहे. यामुळे तुम्हाला तुमच्या जेवणाचा आकार अधिक सहजपणे नियंत्रित करण्यास मदत होईल.
निरोगी पर्यायांचा अवलंब करा - पार्ट्यांमधे केवळ तळलेले पदार्थ आणि साखरेचे पदार्थ खाण्यावर अवलंबून राहू नका. घरी काही निरोगी पर्यायी पदार्थ बनवू शकता, उदा- भाजलेला मखाणा, भाजलेले चणे किंवा फ्रूट सलाड.
advertisement
जेवणानंतर फिरा - दिवाळीच्या मेजवानीनंतर थोडं चालणं खूप फायदेशीर आहे. दहा-पंधरा मिनिटं चालण्यानं पचनसंस्था सुधारू शकते आणि शरीर जड वाटणार नाही. कुटुंबासह थोडं चालायला जाऊ शकता; यामुळे अन्न लवकर पचण्यास मदत होईल आणि तुम्ही सक्रिय राहाल.
advertisement
दिवाळी हा सण आनंदाचा, दिव्यांचा आहे, दिवाळीच्या आनंदात, आरोग्याकडे दुर्लक्ष करु नका. या सोप्या आणि स्मार्ट पद्धतींचा अवलंब करून, कोणत्याही अपराधीपणाशिवाय सणाचा आनंद घेता येईल.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Diwali : सणासुदीच्या काळातही राहा तंदुरुस्त, या खास टिप्स लक्षात ठेवा, दिवाळी आनंदात साजरी करा
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement