Morning Habits : सकाळी या पाच गोष्टींनी करा दिवसाची सुरुवात, दिवस छान जाईल आणि मनस्थिती राहिल चांगली

Last Updated:

नकारात्मक विचारांना दूर करुन ताणतणावानं दिवस सुरू केला तर पुढचा दिवस पण तसाच राहिल. डोक्यात विचार तर सतत येतच असतात पण यातूनही मार्ग काढून प्रत्येकजण पुढे जात असतो. हे टाळण्यासाठी सकाळची सुरुवात चांगलं असणं खूप महत्वाचं आहे. यासाठी इथे सांगितलेल्या पाच गोष्टींमुळे, सकाळ चांगली जाईल आणि संपूर्ण दिवसही ऊर्जावान जाईल.

News18
News18
मुंबई : दिवाळीत घराघरांत अभ्यंग स्नान, उटणं असा सुगंधी दरवळ असतो. दिवाळी म्हटलं की आपसूक लवकर उठणं होतं. पण एरवीही दिवसाची सुरुवात लवकर करणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
प्रत्येकाची दिनचर्या वेगवेगळी असते, कुणी पहाटे उठतं तर कुणी सकाळी लवकर उठतं. लवकर उठणं हे निरोगी जीवनशैलीचा एक महत्त्वाचा भाग आहे. संपूर्ण दिवस कसा जातो हे तुम्ही तुमची सकाळ कशी सुरू करता यावर अवलंबून असते.
नकारात्मक विचारांना दूर करुन ताणतणावानं दिवस सुरू केला तर पुढचा दिवस पण तसाच राहिल. डोक्यात विचार तर सतत येतच असतात पण यातूनही मार्ग काढून प्रत्येकजण पुढे जात असतो. हे टाळण्यासाठी सकाळची सुरुवात चांगलं असणं खूप महत्वाचं आहे. यासाठी इथे सांगितलेल्या पाच गोष्टींमुळे, सकाळ चांगली जाईल आणि संपूर्ण दिवसही ऊर्जावान जाईल.
advertisement
सकाळची सुरुवात कोमट पाण्यानं करा - सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी पिणं फायदेशीर मानलं जातं. यामुळे शरीर हायड्रेटेड राहतं आणि आरोग्यासाठीही कोमट पाणी पिणं चांगलं. दररोज असं केल्यानं तुम्हाला ताजंतवानं वाटेल आणि तुमच्या सकाळची सुरुवात चांगली होईल.
advertisement
सूर्यप्रकाश - दिवसाची सुरुवात करताना, सकाळचा थोडासा सूर्यप्रकाश अंगावर नक्की घ्या. सूर्यप्रकाश हा व्हिटॅमिन डीचा एक चांगला स्रोत आहे, शरीरासाठी तो फायदेशीर स्रोत आहे. शिवाय, सकाळच्या उन्हात वेळ घालवल्यानं तुमची मनस्थिती चांगली होते आणि शांत वाटतं.
ध्यान - रोजच्या जीवनात, ध्यान करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. दररोज सकाळी उठून ध्यान केल्यानं, मन शांती होतं आणि सकारात्मक ऊर्जा जाणवते. हे करण्यासाठी, दररोज सकाळी पाच मिनिटं डोळे बंद करून शांत बसा आणि ध्यान करा. यामुळे तुमचा दिवस छान जाईल.
advertisement
संगीत ऐका - सकाळी तुमचं आवडतं संगीत ऐका. यामुळे तुमचा मूड लगेच चांगला होऊ शकतो आणि दिवसभर सकारात्मक वाटू शकतं.
नाश्ता - सकाळी तेलकट अन्न खाणं टाळा, निरोगी आहार घ्या. यामुळे दिवसभर ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते आणि तुमचा मूड सुधारतो. सकाळी जास्त मसालेदार किंवा जंक फूड खाल्ल्यानं तुमची पचनसंस्था देखील बिघडू शकते.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Morning Habits : सकाळी या पाच गोष्टींनी करा दिवसाची सुरुवात, दिवस छान जाईल आणि मनस्थिती राहिल चांगली
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement