ताणतणाव, जीवनशैलीच्या चुकीच्या सवयी, पौष्टिक घटकांचा अभाव, हार्मोनल बदल आणि केसांच्या रसायनांचा जास्त वापर ही मुख्य कारणं आहेत. केसांना रंग करणं या तात्पुरत्या उपायापेक्षा दीर्घकालीन नुकसान रोखण्याच्या दृष्टीनं काही उपाय करता येतील.
आयुर्वेद आणि घरगुती उपचारांमधे अनेक तेलं आणि नैसर्गिक घटकांचा उल्लेख आहे. यामुळे केस काळे करण्यास मदत होते आणि केसांची मुळं मजबूत करून केस पांढरे होण्यास प्रतिबंध करता येतो. केसांचा रंग मेलेनिन नावाच्या रंगद्रव्यापासून येतो. शरीर कमी मेलेनिन तयार करतं तेव्हा केस हळूहळू राखाडी किंवा पांढरे होऊ लागतात. ही प्रक्रिया खराब आहार, झोपेची कमतरता, ताणतणाव, औषधx आणि प्रदूषणामुळे वाढते.
advertisement
Skin Care : टवटवीत चेहऱ्यासाठी आयुर्वेदिक उपाय, घरी करता येतील सोपे फेसमास्क
केसांना योग्य पोषण आणि योग्य तेल मिळालं तर मेलेनिनचं उत्पादन पुन्हा सक्रिय होऊ शकतं आणि पांढऱ्या केसांची वाढ थांबवता येऊ शकते. पाहूयात काही तेलांचे पर्याय आणि वापर कसा करावा याची माहिती.
आवळा तेल - आवळ्यात व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. यामुळे मेलेनिनचं उत्पादन वाढतं आणि हळूहळू राखाडी केस काळे होणं शक्य होऊ शकतं.
भृंगराज तेल - आयुर्वेदात याला केशराज म्हणतात, म्हणजे केसांचा राजा. भृंगराज तेल राखाडी केस काळे करण्यासाठी, केस गळती रोखण्यासाठी आणि केसांची मुळं मजबूत करण्यासाठी प्रभावी आहे. आठवड्यातून तीन वेळा भृंगराज तेल लावा. हे तेल गरम करून आवळा तेलात मिसळू शकता.
नारळ तेल आणि कढीपत्ता - कढीपत्त्याच्या पानांमधे मेलेनिन पुन्हा सक्रिय करणारे एंजाइम असतात. नारळाच्या तेलासह एकत्रित केल्यानं, ते राखाडी केस काळे करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरु शकतात. एक कप खोबरेल तेल गरम करा. त्यात कढीपत्त्याची पंधरा वीस पानं घाला. पानं काळी पडू लागली की गॅस बंद करा. थंड झाल्यावर गाळून घ्या. रात्री लावा आणि एक तासानंतर धुवा.
तीळाच्या तेलानं केसांची मुळं काळी होतात आणि केस पांढरे होण्याचं प्रमाण कमी होतं. ते नैसर्गिक कंडिशनर म्हणून देखील काम करतं. आवळा पावडर तिळाच्या तेलात मिसळून पेस्ट बनवा आणि ती टाळूला लावा.
कांद्याचा रस आणि नारळ तेल - कांद्याचा रस टाळूमध्ये कॅटालेस एंझाइम वाढवून केस पांढरे होण्यास प्रतिबंध करण्यास मदत करतो. नारळाच्या तेलासह लावल्यानं याचा परिणाम दुप्पट होतो.
Colon Cancer : आतड्यांच्या कर्करोगाचं वाढतं प्रमाण, जाणून घ्या लक्षणं आणि कारणं
मुळांपासून केस काळे करणारे घरगुती घटक:
मेंदी आणि कॉफी: नैसर्गिक केस काळे करतात.
काळे तीळ: दररोज एक चमचा खाल्ल्यानं मेलेनिनचं उत्पादन वाढतं.
आवळ्याचा रस: केसांचा नैसर्गिक रंग राखतो.
शिकाकाई: केसांच्या मुळांना पोषण देते.
पांढरे केस काळे करणं हे एका रात्रीत किंवा लगेच शक्य नसतं. पण मेलेनिन वाढवण्यासाठी काही तेलं आणि नैसर्गिक उपायांचा वापर केला जाऊ शकतो. या उपायांचा काही आठवड्यांत फरक दिसून येईल. आवळा, भृंगराज, कढीपत्ता आणि तीळ तेलामुळे केसांची मुळं मजबूत होतात आणि मेलेनिन वाढायला मदत होते.
