चेहऱ्यावरील मुरुमांचा त्रास वारंवार होऊ नये म्हणून, काही घरगुती गोष्टी चेहऱ्यावर लावता येतात. आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलेल्या काही उपायांनी चेहऱ्यावरचे पिंपल्स म्हणजेच मुरुमं कमी होण्यास मदत होते.
चेहऱ्यावर मुरुमं येण्याचं प्रमाण कमी करण्यासाठी, चेहऱ्याची त्वचा स्वच्छ दिसावी यासाठी आयुर्वेदातले उपाय पाहूया. यात जायफळ, धणे, कोरफडीचा समावेश आहे. यातील गुणधर्म मुरुमांंचं प्रमाण कमी करतात, मुरुमांचे डाग कमी करतात आणि कोणतीही रासायनिक उत्पादनं नसल्यानं चेहऱ्यावर याचे चांगले परिणाम दिसून येतात आणि चेहरा स्वच्छ दिसतो.
advertisement
गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेत्री तमन्ना भाटियानं मुरुमांवर लाळ प्रभावी असल्याचं म्हटलं होतं. आयुर्वेदिक डॉक्टर मनिषा मिश्रा गोस्वामी यांनीही या मुद्द्याचा उल्लेख केला आहे.
मुरुमं घालवण्यासाठी आयुर्वेदिक उपाय - चेहऱ्यावरची मुरुमं घालवण्यासाठी जायफळ उपयुक्त ठरू शकतं.
आयुर्वेदात मुरुमं दूर करण्यासाठी जायफळ हा चांगला पर्याय आहे. त्यात आढळणाऱ्या अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मांमुळे मुरुम कमी होतात आणि मुरुमांमुळे चेहऱ्यावर आलेला लालसरपणाही कमी होतो.
स्वयंपाकात वापरल्या जाणाऱ्या धण्यांचा वापरही त्वचेसाठी उत्तम मानला जातो. धण्यातली अँटी-बॅक्टेरियल संयुगं मुरुम किंवा बॅक्टेरियाची वाढ कमी करतात.
Blood Pressure : रक्तदाब वाढत असेल तर करा हे बदल, रक्तदाब राहिल नियंत्रणात
कोरफडीच्या जेलमधे अॅलोइन दाहक-विरोधी आणि जीवाणूरोधी गुणधर्म असतात. त्याच्या थंड प्रकृतीमुळे, त्वचेवर दिसणारे लाल ठिपके कमी करण्यासाठी प्रभावी आहे.
आयुर्वेदिक तज्ज्ञांनी सांगितले की थुंकी त्वचेवर लावता येते. लाळेतले अँटीबॅक्टेरियल पेप्टाइड्स मुरुम कमी करण्यास प्रभावी असतात. सकाळी उठल्यावर दात घासायच्या आधीची लाळ त्वचेवर लावता येते. ही लाळ जास्त आम्लयुक्त असते.