Blood Circulation: योग्य रक्ताभिसरणासाठीचा कानमंत्र लक्षात ठेवा, सतत बसून राहू नका, या टिप्स ठरतील महत्त्वाच्या

Last Updated:

रक्ताभिसरणात अडथळे येणं शरीरासाठी घातक ठरु शकतं त्यामुळे हालचाल करा, पुरेसं पाणी प्या, रक्ताभिसरणाला पोषक अन्न खा, पायांचे व्यायाम आवर्जून करा. बसून काम करत असाल तर मधे मधे ब्रेक घ्या. थोडंसं चाला आणि परत काम करा असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

News18
News18
मुंबई : Sitting is new smoking हा वाक्प्रचार सध्या प्रचलित झालाय. कारण बैठ्या जीवनशैलीमुळे होणाऱ्या आजारांचं प्रमाण वाढत चाललंय. सतत बसल्यानं शरीरावर त्याचे गंभीर परिणाम दिसून येतायत. सततच्या बैठ्या जीवनशैलीमुळे रक्त पुरवठ्यातही अडथळे येतात आणि हे शरीरासाठी घातक आहेत.
शरीराची अनेक यंत्रणांपैकी एक म्हणजे रक्ताभिसरण. रक्ताभिसरण यंत्रणा म्हणजेच हृदय आणि  रक्तवाहिन्यासंबंधीची यंत्रणा. संपूर्ण शरीराच्या प्रत्येक पेशीला ऑक्सिजन आणि पोषक घटकांचा पुरवठा करण्याचं काम ही यंत्रणा करते. या यंत्रणेत हृदय आणि रक्तवाहिन्यांचं काम महत्त्वाचं असतं.
advertisement
या रक्तवाहिन्यांत कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ लागला किंवा कोलेस्ट्रॉल जमा होऊ लागलं, तर त्यामुळे हृदयापर्यंत रक्त पोहोचण्यात समस्या निर्माण होतात. अशा परिस्थितीत रक्तप्रवाहात अडथळा येऊ लागतो.
रक्तप्रवाह योग्य नसेल तर शरीराच्या वेगवेगळ्या भागात वेदना आणि कडकपणा येतो. विशेषतः पायांवर त्याची लक्षणं दिसतात आणि व्यक्तीला चालण्यास त्रास होतो. रक्तप्रवाह योग्य नसेल तर पायांत तीव्र वेदना होतात. रक्तवहिन्यासंबंधी सर्जन आणि व्हेरिकोज व्हेन्स तज्ज्ञ डॉ. सुमित कपाडिया यांनी रक्तप्रवाह कसा सुधारता येईल यांनी सांगितलेला सल्ला महत्त्वाचा आहे.
advertisement
हालचाल करा - शरीराची हालचाल करत राहणं महत्वाचं आहे. बसणं हे नवीन युगातील धूम्रपान आहे असं डॉक्टर म्हणतात कारण बसणं तितकंच हानिकारक आहे. म्हणून हालचाल करत जा. दर 30 ते 40 मिनिटांनी उठा आणि थोडं चालत जा.
advertisement
स्वतःला हायड्रेटेड ठेवा - म्हणजेच पुरेसं पाणी प्या. स्वतःला हायड्रेटेड ठेवणं महत्वाचं आहे. पुरेसं पाणी न पिणं हे रक्ताभिसरण बिघडण्याचं एक कारण आहे. रक्ताभिसरण सुधारण्यासाठी पाणी पित राहा.
रक्ताभिसरण करणारे पदार्थ खा - तुमच्या आहारात रक्ताभिसरण सुधारणारे पदार्थांचा समावेश करा. बीट, हिरव्या पालेभाज्या, लिंबूवर्गीय फळं, लसूण आणि सुकामेवा यामुळे रक्ताभिसरण सुधारतं.
advertisement
पायांचे व्यायाम - पायांचे काही व्यायाम केल्यानं रक्ताभिसरण सुधारतं. पोटरीच्या स्नायूंमधून रक्त थेट हृदयाकडे जातं. त्यामुळे, पायांचे व्यायाम केल्यानं शरीराचं रक्ताभिसरण सुधारतं आणि हृदय निरोगी राहतं.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Blood Circulation: योग्य रक्ताभिसरणासाठीचा कानमंत्र लक्षात ठेवा, सतत बसून राहू नका, या टिप्स ठरतील महत्त्वाच्या
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement