Tur Dal : जेवणात तूर डाळीचं प्रमाण जास्त असेल तर थांबा, ही माहिती आधी वाचा

Last Updated:

चव, पोषण मूल्य आणि पचायला सोपी असल्यानं तूर डाळ घराघरातली लोकप्रिय डाळ आहे. साधी डाळ असो किंवा फोडणी दिलेली पण तूर डाळ सर्व वयोगटातील लोकांना आवडते. पण, याच चांगल्या पौष्टिक डाळीचे काही तोटे देखील असू शकतात. विशेषतः ही डाळ काहींसाठी हानिकारक असू शकते.

News18
News18
मुंबई : चपती किंवा पोळी, भाजी, वरण, भात हे घराघरातलं रोजचं जेवण. आपल्या घरात तूर डाळ बहुतेकदा रोज शिजवली जाते. ही डाळ जवळजवळ दररोज भातासोबत बनवली जाते. या डाळीला अरहर डाळही म्हटलं जातं.
चव, पोषण मूल्य आणि पचायला सोपी असल्यानं तूर डाळ घराघरातली लोकप्रिय डाळ आहे. साधी डाळ असो किंवा फोडणी दिलेली पण तूर डाळ सर्व वयोगटातील लोकांना आवडते. पण, याच चांगल्या पौष्टिक डाळीचे काही तोटे देखील असू शकतात. विशेषतः ही डाळ काहींसाठी हानिकारक असू शकते. समजून घेऊया तूरडाळ खाण्याचे फायदे आणि तोटे
advertisement
- प्रथिनांचा स्रोत - तूर डाळ ही प्रथिनांचा एक चांगला स्रोत आहे. विशेषत: शाकाहारींसाठी तूर डाळ एक उत्कृष्ट प्रथिन स्रोत आहे. स्नायूंच्या दुरुस्ती आणि वाढीसाठी प्रथिनं मदत करतात.
- पचनासाठी उपयुक्त - तूर डाळीमध्ये असलेल्या फायबरनं पचन सुधारतं आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.
advertisement
- हृदयासाठी फायदेशीर - तूर डाळ हृदयासाठी खूप फायदेशीर मानली जाते. त्यात पोटॅशियम आणि फायबरचं प्रमाण चांगलं असतं. रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी आणि हृदय निरोगी ठेवण्यासाठी याची मदत होते.
- वजन कमी करण्यास उपयुक्त - तूर डाळीत कॅलरीज कमी आणि फायबर जास्त असतं, ज्यामुळे पोट भरलेलं वाटतं आणि जास्त खाणं टाळता येतं. म्हणूनच, ते वजन कमी करण्यास देखील उपयुक्त आहे.
advertisement
- साखर नियंत्रित करण्यास उपयुक्त - तूर डाळ खाल्ली तर ती साखर नियंत्रित करण्यास देखील मदत करू शकते. तूर डाळीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, ज्यामुळे ती मधुमेहींसाठी चांगली मानली जाते.
तूरडाळीचे तोटे -
- प्युरीन: अरहर डाळीमध्ये प्युरीन असतं, जे शरीरात यूरिक अॅसिड वाढवू शकते. यामुळे संधिवात (गाउट) रुग्णांना समस्या निर्माण होऊ शकतात.
advertisement
- गॅस आणि अपचनाची समस्या - काहींना तूरडाळ खाल्ल्यानंतर पोटात गॅस किंवा जडपणा जाणवतो. अनेकदा डाळ व्यवस्थित शिजली नसेल तर हा त्रास जाणवतो.
- मूत्रपिंडाच्या रुग्णांसाठी खबरदारी - ज्यांना किडनीचा त्रास आहे त्यांनी प्रथिनांचं सेवन मर्यादित करावं. कारण अशावेळी जास्त तूर डाळ खाणं हानिकारक ठरू शकतं.
advertisement
- मूत्रपिंडाचे रुग्ण: जास्त प्रथिनयुक्त आहारामुळे मूत्रपिंडांवर दबाव वाढतो, म्हणून डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय तूर डाळ खाऊ नका.
- काहींची पचनक्रिया संवेदनशील असते. वारंवार गॅस, अपचन किंवा आम्लपित्त यांचा त्रास असलेल्यांनी तूर डाळ मर्यादित प्रमाणात खावी.
- संधिरोगाच्या रुग्णांमधे प्युरिनमुळे यूरिक अ‍ॅसिड वाढलं तर सांधेदुखी आणि सूज येऊ शकते.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Tur Dal : जेवणात तूर डाळीचं प्रमाण जास्त असेल तर थांबा, ही माहिती आधी वाचा
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement