Fenugreek Seeds : घराघरांतलं औषध - मेथीचे दाणे, अनेक रोगांवर रामबाण उपाय

Last Updated:

मेथीचे दाणे योग्यरित्या वापरले तर ते अनेक आरोग्य समस्यांवर मूळ उपाय ठरु शकतं. दररोज सकाळी मेथीचे दाणे खाल्ल्यानं शरीर निरोगी राहतं. मेथीच्या दाण्यांची प्रकृती उष्ण असते, यामुळे काहींना त्रास होऊ शकतो, त्यामुळे खाण्याआधी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

News18
News18
मुंबई : आजी - पणजीच्या काळापासूनच प्रकृतीत काही बदल जाणवला तर घरगुती उपचारांवर आधी भर  असायचा. कोणत्याही आरोग्य समस्येवर उपचार करण्याची ही घराघरातली जुनी सवय आहे. आपल्या आजींनी वापरलेले घरगुती उपचार म्हणूनच खूप प्रभावी आहेत आणि आजही मोठ्या आजारांवरही रामबाण उपाय मानले जातात. अशीच एक गोष्ट म्हणजे मेथीचे दाणे. चवीबरोबरच आजार बरे करण्यासाठी देखील खूप प्रभावी मानला जातो.
advertisement
मेथीच्या बियांत फायबर, लोह, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन बी6 आणि अँटीऑक्सिडंट्स सारखे पोषक घटक आढळतात. यामुळे शरीर आतून मजबूत होण्यास मदत होते. मेथी दाणे पावडरच्या स्वरूपात, किंवा भिजवूनही खाऊ शकता. यासाठी रात्रभर चमचा मेथीचे दाणे रात्रभर एक ग्लास पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी पाणी गाळून प्या आणि बिया चावून घ्या. ही पद्धत सर्वात प्रभावी मानली जाते कारण यामुळे त्यातील पोषक घटक थेट शरीरात शोषले जातात.
advertisement
मधुमेह - मेथीच्या दाण्यांत असलेले गॅलेक्टोमनन नावाचं फायबर रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करतं. यामुळे इन्सुलिन संवेदनशीलता वाढते आणि साखरेची पातळी संतुलित ठेवण्यास मदत होते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी ते खूप फायदेशीर आहे.
कोलेस्ट्रॉल आणि हृदय आरोग्य - मेथीच्या बिया शरीरातील एलडीएल म्हणजेच वाईट कोलेस्ट्रॉल कमी करतात आणि एचडीएल म्हणजेच चांगलं कोलेस्ट्रॉल वाढवतात. यामुळे हृदयाचे ठोके सामान्य राहतात आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो.
advertisement
वजन कमी करण्यास उपयुक्त - मेथीच्या दाण्यांमुळे भूक नियंत्रित होते आणि चयापचयाचा वेग गतिमान होतो. यात असलेल्या फायबरमुळे पोट बराच वेळ भरलेलं वाटतं, यामुळे अतिरिक्त अन्न खाल्लं जात नाही.
पचनसंस्था मजबूत राहते - मेथीच्या दाण्यांमुळे गॅस, अपचन, आम्लपित्त आणि बद्धकोष्ठता यासारख्या समस्या कमी होतात. दाहक-विरोधी गुणधर्मांमुळे आतडी शांत राहतात आणि पचन सुधारतं.
advertisement
केस गळणं - त्वचेच्या समस्या - मेथीत असलेली प्रथिनं आणि निकोटिनिक आम्ल यामुळे केस गळणं थांबतं आणि केस मजबूत होतात. अँटीऑक्सिडंट्समुळे त्वचेला चमक येते आणि मुरुमांचं प्रमाण कमी होतं.
मेथीचे दाणे योग्यरित्या वापरले तर ते अनेक आरोग्य समस्यांवर मूळ उपाय ठरु शकतं. दररोज सकाळी मेथीचे दाणे खाल्ल्यानं शरीर निरोगी राहतं. मेथीच्या दाण्यांची प्रकृती उष्ण असते, यामुळे काहींना त्रास होऊ शकतो, त्यामुळे खाण्याआधी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.
advertisement
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Fenugreek Seeds : घराघरांतलं औषध - मेथीचे दाणे, अनेक रोगांवर रामबाण उपाय
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement