TRENDING:

Beetroot Juice benefits: शरीरात रक्ताची कमतरता आहे? सलग 15 दिवस प्या ‘हा’ ज्यूस, हृदयही राहील फिट

Last Updated:

Health benefits of beetroot juice in Marathi: डोळ्यांच्या आरोग्यासाठी गाजर किंवा बिटरूट खाणं हे फायद्याचं ठरतं हे आपण लहानपणापासून ऐकत आलोय. मात्र तुम्हाला माहिती आहे का बीटरूटमध्ये लोह, फॉलिक ॲसिड, व्हिटॅमिन सी आणि मॅगनीज सारखे पोषक घटक मुबलक प्रमाणात आढळतात. त्यामुळे बीटरूट खाणं हे आरोग्यासाठी फायद्याचं ठरतं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : आजच्या धकाधकीच्या जीवनात अनेकांना अनेक आजारांचा सामना करावा लागतो. फिट राहण्यासाठी व्यायाम करण्याचा , जंकफूड टाळून पौष्टिक आहार घेण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ देतात. कामाच्या व्यापामुळे अनेकांना जंकफूड टाळता येत नाही. अशा व्यक्ती फळं किंवा फळांचा ज्यूस पिणं पसंत करतात. डोळ्यांच्या आरोग्यासाठी गाजर किंवा बिटरूट खाणं हे फायद्याचं ठरतं हे आपण लहानपणापासून ऐकत आलोय. मात्र तुम्हाला माहिती आहे का की, बीटरूट हे फक्त डोळ्यांच्याच नाही तर संपूर्ण आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जातं.
News18
News18
advertisement

जाणून घेऊयात बीटरूट खाण्याचे किंवा बीटरूटचा ज्यूस पिण्याचे फायदे

बीटरूटमध्ये लोह, फॉलिक ॲसिड, व्हिटॅमिन सी आणि मॅगनीज सारखे पोषक घटक मुबलक प्रमाणात आढळतात. त्यामुळे बीटरूट खाणं हे आरोग्यासाठी फायद्याचं ठरतं. मात्र नोकरदार वर्गाला कोणत्याही वेळी बीटरूट कापून खाणं शक्य नसतं. त्यामुळे बीटरूटचा ज्यूस पिणं हे त्यांच्या फायद्याचं ठरू शकतं. आपल्याला माहिती आहे की, रक्त हा आपल्या शरीरातला एक महत्त्वाचा घटक आहे. जर एखाद्या व्यक्तीच्या शरीरात रक्ताची कमतरता असेल तर त्या व्यक्तीला अनेक आजारांचा सामना करावा लागू शकतो. रक्ताची कमतरता असलेल्या एखाद्या व्यक्तीने सलग एक किंवा दोन आठवडे सतत बीटरूटचा ज्यूस प्यायला तर त्यांच्या शरीरात रक्ताचं प्रमाण वाढायला मदत होऊ शकते. याशिवाय रक्ताचं प्रमाण वाढल्यामुळे रक्तप्रवाह सुधारून शरीरात ऑक्सिजनचं प्रमाणही वाढतं. त्यामुळे थकवा येण्याची समस्या कमी होते. ज्यांना सतत अशक्तपणाचा सामना करावा लागतो, त्यांच्यासाठी बीटरूटचा रस सर्वात फायदेशीर आहे.

advertisement

रंजना न्यूट्रिग्लो क्लिनिकच्या संस्थापक आणि आहारतज्ज्ञ रंजना सिंह यांनी न्यूज18 ला सांगितलं की, ज्यांना अशक्तपणाच्या तक्रारी आहेत किंवा ज्यांच्या शरीरात लोहाची कमतरता आहे अशा व्यक्तींनी सलग 15 दिवस सतत बीटरूटचा ज्यूस प्यावा. यानंतर, एक आठवड्याचा ब्रेक घ्यावा आणि त्यानंतर पुन्हा बीटरूटचा ज्यूस पिण्यास सुरूवात करावी. सलग 15 दिवसांपेक्षा जास्त बीटरूटचा ज्यूस पिऊ नये.

advertisement

यकृत, हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर

आहारतज्ज्ञांच्या मते, बीटरूटचा रसाने पचनसंस्था निरोगी राहते. पोट आतून स्वच्छ व्हायला मदत होते. बीटरूटचा रस यकृताला डिटॉक्सिफाय करण्याचं काम करतो, ज्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. यामुळे यकृताचं आरोग्य सुधारतं. बीटरूटचा रस हृदयाच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. त्यात नायट्रेट्सही असतात, जे रक्तवाहिन्या रुंद करण्यास मदत करतात. यामुळे रक्तप्रवाह सुधारून रक्तदाब नियंत्रणात राहायला मदत होते. बीटरूटचा रस नियमितपणे प्यायल्याने कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित राहून हृदयरोगाचा धोका कमी होतो.

advertisement

त्वचेच्या आरोग्यासाठी फायद्याचं

आहारतज्ज्ञ रंजना सिंह यांच्या मते, बीटरूटचा रस शरीरासाठी एक शक्तिशाली अँटिऑक्सिडंट म्हणून काम करतो आणि शरीराचं मुक्त रॅडिकल्सपासून रक्षण करतो. बीटरूटचा रस नियमितपणे प्यायल्याने त्वचेचं आरोग्य सुधारतं आणि चेहऱ्यावर सुरकुत्या येण्याची प्रक्रिया मंदावते.

हे सुद्धा वाचा : Benefits of beetroot: आरोग्यदायी बीटरूटचे त्वचेसाठीचे ‘हे’ फायदे माहिती आहेत का? त्वचा उजळण्यापासून दूर होतील पिंपल्सच्या समस्या

advertisement

डायबिटीस असलेल्यांनी घ्यावी काळजी

बीटरूटचा रस आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतो, परंतु मधुमेहाच्या रुग्णांनी बीटरूटचा ज्यूस पिण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या. ज्यांच्या रक्तात साखरेचं प्रमाण अधिक आहे त्यांनी हा रस पिणं टाळावं. मात्र ज्यांच्या डायबिटीस असूनही ज्यांनी साखर नियंत्रणात आहे अशा व्यक्ती डॉक्टरांच्या सल्ल्याने नियंत्रित प्रमाणात बीटरूटचा ज्यूस पिऊ शकतात. जास्त प्रमाणात बीटरूटचा ज्यूस प्यायल्याने रक्तातलं कॅल्शियमचं प्रमाण कमी होऊन किडनी विकारांचा धोका उद्भवू शकतो.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Beetroot Juice benefits: शरीरात रक्ताची कमतरता आहे? सलग 15 दिवस प्या ‘हा’ ज्यूस, हृदयही राहील फिट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल