बीटात असलेले अँटीऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वं आणि खनिजांमुळे त्वचा डिटॉक्सिफाय होते, रक्ताभिसरण वाढतं आणि त्वचा चमकदार होते. तुम्हालाही त्वचा नैसर्गिक पद्धतीनं निरोगी आणि चमकदार बनवायची असेल, तर बीटपासून बनवलेले पाच फेस मास्क तुमच्यासाठी परफेक्ट आहेत.
बीटरूट आणि दही मास्क - त्वचेचं चांगलं मॉइश्चरायझिंग आणि त्वचा चमकदार बनवण्यासाठी हा मास्क चांगला पर्याय आहे. यासाठी, एक चमचा बीटरूट पेस्ट, एक चमचा ताजं दही, बीट बारीक करून त्याची पेस्ट बनवा आणि दह्यात मिसळा. पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि पंधरा-वीस मिनिटं सुकू द्या. नंतर थंड पाण्यानं धुवा. दह्यात लॅक्टिक एसिड असतं, यामुळे मृत त्वचेच्या पेशी काढून टाकल्या जातात. बीटामुळे त्वचा उजळते, आणि दह्यामुळे मॉइश्चरायझेशन होतं.
advertisement
Diwali : ऐन दिवाळीत केस तेलकट ? हे उपाय घेतील केसांची काळजी, नक्की वाचा या टिप्स
बीट आणि मध मास्क - हा मास्क वापरल्यानं त्वचेवर चांगली चमक येते. यासाठी एक चमचा बीटचा रस,
एक चमचा मध हे साहित्य लागेल. बीटच्या रसात मध मिसळा आणि ते चेहऱ्याला लावा. पंधरा मिनिटांनी थंड पाण्यानं चेहरा धुवा. मधामुळे त्वचा मऊ होते. बीटरूटचा रस त्वचेचा रंग समतोल करतो.
बीट आणि बेसनाचा मास्क - मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यासाठी हा मास्क चांगला आहे. यासाठी, एक चमचा बीट पेस्ट, एक चमचा बेसन, थोडं गुलाब पाणी एकत्र करून पेस्ट बनवा आणि चेहऱ्याला लावा. दहा - पंधरा मिनिटं सुकू द्या आणि नंतर हलक्या हातानं घासून धुवा. बेसनामुळे त्वचेतील मृत पेशी निघून जातात.
बीटरूट पेस्टमुळे त्वचा उजळते.
Diwali : ऐन दिवाळीत घसा दुखतोय ? समजून घ्या कारणं आणि उपचार
बीट आणि ऑलिव्ह ऑइल मास्क - कोरड्या त्वचेसाठी हा मास्क उपयुक्त आहे. एक चमचा बीटरूट रस, एक चमचा ऑलिव्ह ऑइल एकत्र मिसळा आणि चेहऱ्याला लावा, नंतर वीस मिनिटांनी धुवा. ऑलिव्ह ऑइल त्वचेला खोलवर मॉइश्चरायझ करते. बीटरूटचा रस त्वचेवर तजेला आणतो आणि चमकदार बनवतो.
बीट आणि हळदीचा मास्क - डाग आणि मुरुमं कमी करण्यासाठी चांगला आहे. एक चमचा बीट पेस्ट, अर्धा
चमचा, एक चमचा मुलतानी माती हे सर्व घटक एकत्र करून पेस्ट बनवा आणि चेहऱ्याला लावा. पंधरा मिनिटांनी ते धुवा. हळद अँटीबॅक्टेरियल आहे, हळदीमुळे मुरुमं कमी होतात. मुलतानी माती त्वचेतील अतिरिक्त तेल शोषून घेते. कुठलाही फेसमास्क वापरण्याआधी पॅच टेस्ट नक्की करा.