पूर्वी कडुनिंबाची पानं टाकूनच आंघोळ करायचे. ही पानं आरोग्यासाठी खूप गुणकारी आहेत.
कडुनिंबाचं पाणी अंगावरुन जाणं जसं चांगलं मानतात तसंच रोज रिकाम्या पोटी कडुनिंबाची पानं
चघळायला सुरुवात केली तर तुमचं आरोग्य चांगलं राहील. आयुर्वेदात कडुनिंबाचा वापर वेगवेगळ्या प्रकारे
केला जातो. कडुनिंबाच्या फांद्या, पानं आणि बिया औषध म्हणून वापरतात. खाण्याव्यतिरिक्त, कडुनिंबाची
advertisement
पानं कुस्करून त्वचेसाठी वापरली जायची. ही पानं उकळवून केस धुण्यासाठी वापरली जातात, ज्यामुळे टाळूच्या समस्या दूर राहतात. कडुनिंबाची पानं कडू नक्कीच असतात पण ती शरीर निरोगी ठेवतात.
पाहूयात कडुनिंबाची पानं चघळण्याचे काही फायदे...ही पानं रोज रिकाम्या पोटी
चघळल्यानं काही आजार टाळता येतात.
बद्धकोष्ठता -
कडुनिंबाची पानं रोज चघळल्यानं बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. कडुनिंबाचं सेवन केल्यानं
बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते आणि पोट फुगणं आणि गॅस तयार होण्याच्या समस्येपासूनही आराम
मिळतो. या पानांमध्ये आढळणारे फायबर पोटाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी उपयुक्त आहेत.
Toothache : दातदुखीमुळे हैराण ? या पाच पद्धतींचा करा वापर, दातदुखी होईल कमी
रक्तातील साखरेचं नियंत्रण -
रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी कडुनिंबाच्या पानांचं सेवन करणं उपयुक्त आहे.
कडुनिंबाची पानं सकाळी रिकाम्या पोटी चघळणं मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे.
कडुनिंबाची पानं रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवतात.
Hair care - केसांच्या वाढीसाठी सर्वोत्तम उपाय, कोरफडीची जेल ठरते गुणकारी, पाहा कसा करायचा वापर
यकृताला फायदा होतो-
रिकाम्या पोटी कडुनिंबाच्या पानांचं सेवन केल्यानं यकृतालाही फायदा होतो. कडुनिंबाच्या पानांमध्ये
दाहक-विरोधी गुणधर्म भरपूर असतात आणि शरीराला ऑक्सिडेटिव्ह तणावापासून दूर ठेवतात.
या पानांचं सेवन केल्यामुळे यकृताच्या ऊतींना होणारं नुकसानही कमी होतं.
कडुनिंबाची किती पानं चघळायची -
अनेक वेळा लोकांना असं वाटतं की त्यांनी एखादी गोष्ट जास्त खाल्ली तर शरीराला त्याचे फायदे जास्त मिळतात.
उलट कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो. अशा परिस्थितीत कडुनिंबाची पानं मर्यादित प्रमाणातच खावीत.
एकाच वेळी खूप पानं खाण्याऐवजी, 4 ते 5 पानं सकाळी रिकाम्या पोटी चघळावीत.