Hair care - केसांच्या वाढीसाठी सर्वोत्तम उपाय, कोरफडीची जेल ठरते गुणकारी, पाहा कसा करायचा वापर
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
आपण कसे दिसतो हे आपल्या केसांवर अवलंबून असतं. त्यासाठी आहार महत्त्वाचा आहेच, सोबत केस वाढवण्यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे कोरफड. केसांची वाढ चांगली होण्यासाठी कोरफडीचा गर लावला तर केस कमी वेळात दुप्पट वेगानं वाढतील.
मुंबई - आपण कसे दिसतो हे आपल्या केसांवर अवलंबून असतं. त्यासाठी आहार महत्त्वाचा आहेच, सोबत केस वाढवण्यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे कोरफड. केसांची वाढ चांगली होण्यासाठी कोरफडीचा गर लावला तर केस कमी वेळात दुप्पट वेगानं वाढतील.
कोरफड जेल केसांवर तेलाप्रमाणे लावा. आठवड्यातून एकदा अशा प्रकारे जेल वापरल्यानं, केसांची वाढ कमी वेळात होऊ शकते. त्यामुळे दाट, लांबसडक केसांसाठी कोरफड जेलचा वापर करा. तुम्हालाही लांब केस हवे असतील आणि तुमच्या केसांची वाढ खूपच मंद असेल तर, याचा वापर नक्की करा.
advertisement
आठवड्यातून एकदा असं केल्यानं कमी वेळात केसांची जास्त वाढ होऊ शकते.
१. बदाम तेल आणि कोरफड जेल -
advertisement
केसांच्या वाढीसाठी केसांना बदामाचं तेल लावा, त्यात कोरफड जेल मिसळा. तेल कोमट केल्यानंतर
ते केसांना लावू शकता. नारळाच्या तेलात मिसळूनही कोरफड जेल लावू शकता.
advertisement
२. कोरफड जेलचा मास्क -
कोरफडीच्या जेलनं तुम्ही टाळूला मालिश करू शकता. 1 किंवा 2 तास कोरफडीचा मास्क
ठेवल्यानंतर, केस सौम्य शाम्पूनं धुवा.
३.आलं आणि कोरफडीचा जेल -
आल्याच्या १ तुकड्याचा रस तुमच्या केसांच्या वाढीसाठी रामबाण उपाय ठरू शकतो. फक्त त्यात
advertisement
कोरफड जेल मिक्स करा आणि केसांना 10 ते 15 मिनिटं लावा, नंतर 1 तासानंतर केस सौम्य शॅम्पूनं धुवा. आठवड्यातून एकदा असं केल्यानं
तुम्हाला 7 दिवसात तुमच्या केसांची चमक आणि लांबी यात फरक दिसू शकतो.
४. मेथी आणि कोरफड जेल -
मेथी पावडर कोरफड जेलमध्ये मिसळून एरंडेल तेल लावल्यानं केसांची वाढही चांगली होऊ शकते.
advertisement
1 कप कोरफडीच्या जेलमध्ये फक्त 2 चमचे मेथी पावडर आणि एरंडेल तेल मिसळा आणि
केसांना लावा. यानंतर, सौम्य शॅम्पूनं केस पूर्णपणे स्वच्छ करा. यामुळे देखील केसांची
वाढ चांगली होऊ शकते.
यासगळ्यासोबतच तुमच्या आहाराकडेही लक्ष ठेवा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 03, 2024 10:31 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Hair care - केसांच्या वाढीसाठी सर्वोत्तम उपाय, कोरफडीची जेल ठरते गुणकारी, पाहा कसा करायचा वापर