रक्तदानानंतर नवीन रक्त तयार होण्यासाठी किती दिवस लागतात? काय आहेत याचे फायदे?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
रक्तदान करण्याबाबत लोकांच्या मनात अनेक प्रश्न आणि शंका आहेत. अनेकांना असे वाटते की रक्तदान केल्याने आपले शरीर अशक्त होते. पण यामध्ये कोणतेही तथ्य नाही.
मुंबई : आपल्याकडे रक्तदानाला श्रेष्ठदान म्हटले गेले आहे. केवळ एक युनिट रक्त दान केल्याने तीन जणांचे प्राण वाचवता येऊ शकतात. मात्र रक्तदान करण्याबाबत लोकांच्या मनात अनेक प्रश्न आणि शंका आहेत. अनेकांना असे वाटते की रक्तदान केल्याने आपले शरीर अशक्त होते. पण यामध्ये कोणतेही तथ्य नाही. रक्तदान केल्याने शरीराला काहीही त्रास होत नाही. याउलट रक्तदान केल्याने व्यक्तीला अनेक फायदे मिळतात. हे फायदे कोणते आहेत ते जाणून घ्या.
- रक्तदान केल्याने अनेक आजारांपासून बचाव होऊ शकतो.
- मेंदूचे कार्य सुधारते आणि तो अधिक चांगल्या क्षमतेने काम करू लागतो.
- रक्तदाब नियंत्रणात राहतो. हृदयाचे कार्य सुधारते.
- वजन नियंत्रणात राहते.
- कॅन्सरसारख्या गंभीर आजारांचा धोका कमी होतो.
शरीरात हिमोग्लोबिन कमी झाल्यावर नक्की काय होतं? कडीपत्ता दूर करेल समस्या, पाहा कसं?
- भावनिक आणि मानसिक आरोग्य सुधारते.
advertisement
रक्तदान केल्यानंतर शरीर कशाप्रकारे पूर्ववत होते?
रक्तदान केल्याने शरीराला कोणताही त्रास होत नाही. केवळ काही वेळेसाठी अशक्तपणा जाणवतो. मात्र चांगला आहार घेतल्याने शरीर वेगाने बरे होते. शरीरातील रक्तातील पातळी पुन्हा वाढवण्यासाठी आहारात पालक, मटार, डाळी, पनीर, हिरव्या भाज्या, मनुक्यांचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते. या पदार्थांमुळे रक्त वेगात तयार होऊ लागते. यावेळी तुम्ही नारळपाणी, दही, ताक याचेही सेवन केले पाहिजे. त्याचबरोबर भरपूर झोप घेणेही आवश्यक आहे.
advertisement
रक्तदान केल्यानंतर नवीन रक्त तयार होण्यासाठी किती दिवस लागतात?
रक्तदानाच्या वेळी फक्त एक युनिट म्हणजे 350 मिलीग्राम रक्त एका वेळी घेतले जाते, जे शरीरात असलेल्या रक्ताचा पंधरावा भाग आहे. रक्तदान केल्यानंतर लगेचच शरीर त्यातून बरे होण्यास सुरुवात करते. नवीन रक्त 24 तासांच्या आत तयार होते. फक्त आहार योग्य प्रमाणात आणि निरोगी असावा. आहारात फळे, रस आणि दूध यांचा समावेश असावा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 02, 2024 7:43 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
रक्तदानानंतर नवीन रक्त तयार होण्यासाठी किती दिवस लागतात? काय आहेत याचे फायदे?