छत्रपती संभाजीनगर : उपाशी पोटी गरम पाणी पिण्याचे भरपूर फायदे हे आपल्या शरीराला होतात. तसेच तूप खाण्याचे देखील खूप फायदे आपल्या शरीराला होतात. पण तूप आणि गरम पाणी एकत्र करून जर आपण ते पाणी पिल तर आपल्या भरपूर असे पोषण घटक मिळतात. तर याविषयीच आपल्याला आहार तज्ज्ञ रसिका देशमुख यांनी माहिती दिली आहे.
advertisement
तूप आणि गरम पाणी पिण्याचे फायदे काय?
ज्यांना कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो. त्यासोबतच जे लेट नाईट काम करतात अश्या लोकांनी उपाशी पोटी सकाळी एक चमचा तूप पाण्यात टाकून हे घ्यायला हवं. यामुळे तुमचं पोट साफ व्हायला देखील मदत होते आणि तुमच्या आतड्यांना एक प्रकारचं संरक्षण देखील यामुळे मिळतं. जर तुम्हाला दररोज हे तूप पाण्यात टाकून घ्यायचं असेल तर त्यासाठी तुम्ही गाईचे शुद्ध तूप वापरायला हवं कारण की गाईचे तूप हे म्हशीच्या तुपापेक्षा अतिशय शुद्ध आणि पोषक असं असतं, असं आहार तज्ज्ञ सांगतात.
गोड खाऊन तुमचं आयुष्य होतंय कमी? रात्रीच्या वेळी काय खावं काय खाऊ नये, पाहा Video
त्यासोबतच अनेक जणांना अपचनाचा देखील त्रास होतो. यामुळे आपल्या तोंडातलं देखील येतं तर यासाठी जर तुम्ही हे गरम पाण्यात तूप टाकून प्यायला तर तुम्हाला भरपूर त्याचा फायदा होतो. तुमचं पोट साफ होतं आणि तुम्हाला अपचनाचा देखील त्रास होणार नाही. पाच ते दहा ग्रॅम तुम्ही दररोज पाण्यात टाकून घ्यावे म्हणजे साधारणपणे एक चमचा तेवढं पुरेसा आहे. यामुळे तुम्हाला भरपूर फायदा होतो.
पण दररोज तुम्ही हे उपाशीपोटी घेणे गरजेचे आहे. यामध्ये तुमची नियमित्ता असणे गरजेचे आहे तरच तुम्हाला याचे फायदे मिळतात. आणि यामुळे तुमचं वजन कमी होण्यासाठी देखील मदत होते. तुम्ही व्यवस्थित रित्या हे दररोज घेतलं तर तुम्हाला फायदा होईल आणि तुम्ही निरोगी राहाल, असं आहार तज्ज्ञ रसिका देशमुख यांनी सांगितलं.
सूचना: इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी, आपण आपल्या आरोग्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वत: डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.





