वजन नियंत्रणासाठी बदाम उपयुक्त आहेत. बदामामध्ये अँटी-ऑक्सिडेंट असतात आणि ते शरीराला चांगली ऊर्जा देतात. अशा स्थितीत सकाळी रिकाम्या पोटी बदाम खाल्ल्यानं पोट भरल्यासारखं वाटतं, ज्यामुळे भूक जास्त लागत नाहीआणि कॅलरीजचं प्रमाण वाढतं.
'अरे आळस येतोय यार...' सहकाऱ्याला असं बोलतो खरं, पण ऑफिसमध्ये Lunch नंतरच का येते जास्त झोप?
पचनासाठी फायदेशीर -
advertisement
भिजवलेले बदाम रिकाम्या पोटी खाल्ल्यानं पचनक्रिया चांगली राहते. बदामामध्ये फायटिक ऍसिड असते जे शरीराला इतर आवश्यक खनिजं शोषण्यास मदत करते. यामुळे पोट फुगल्यासारख्या समस्याही दूर राहतात.
मेंदूचं कार्य सुधारते -
बदाम रात्रभर भिजवून ठेवावेत, सकाळी रिकाम्या पोटी बदाम खाल्ल्यानं स्मरणशक्ती सुधारण्यास मदत होते. यामुळे मेंदूच्या कार्याला फायदा होतो. बदाम हे रिबोफ्लेविनचा चांगला स्रोत आहे जो मेंदूच्या आरोग्यासाठी चांगला आहे.
तरैया: गणेश विसर्जनानंतर 9 दिवस चालतो मुलींचा उत्सव; शेणातून साकारतात कलाकृती
हृदयाच्या आरोग्यासाठी -
बदामाचं सेवन हृदयाच्या आरोग्यासाठीही चांगलं असतं. बदामात ट्रान्स फॅट नसतात. निरोगी मोनोसॅच्युरेटेड फॅट्स असल्यानं, बदाम खराब कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी करतात आणि चांगलं कोलेस्टेरॉल वाढवण्यास मदत करतात.
मधुमेह नियंत्रणासाठी उपयुक्त -
भिजवलेल्या बदामांचा मधुमेह नियंत्रणातही फायदे होतो. त्यामध्ये कर्बोदकं आणि प्रथिनं, फायबर आणि मॅग्नेशियम असतं, ज्यामुळे रक्तातील साखर वाढण्यास प्रतिबंध करता येतो.
त्वचेसाठी फायदेशीर -
बदामामध्ये अनेक खनिजं आणि पोषक घटक असतात ज्यामुळे बदाम त्वचेसाठी फायदेशीर आहेत. यामुळे त्वचेचं रॅडिकल्स आणि ऑक्सिडेटिव्ह तणावापासून संरक्षण करता येतं. बदामाचं सेवन केल्यानं त्वचा चमकदार राहते.
शरीरात ऊर्जा राहते -
सकाळी रिकाम्या पोटी बदाम खाल्ल्यानं, उर्जा वाढते. यामुळे शरीराला व्हिटॅमिन बी, हेल्दी फॅट्स आणि मॅग्नेशियम चांगल्या प्रमाणात मिळतात. त्यामुळे बदामांचं सेवन शरीरासाठी आवश्यक आहे.
