TRENDING:

Benefits of Walnuts : तब्येत तंदुरुस्त ठेवण्यासाठी खा अक्रोड, आरोग्यासाठी आहे फायदेशीर

Last Updated:

सुका मेवा आरोग्यासाठी फायदेशीर आहे. अक्रोड खाणं मेंदू आणि हृदयाच्या आरोग्यासाठीही उपयुक्त आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : जेवणातून आवश्यक घटक मिळतात पण शरीराला आणखी आवश्यक घटकांसाठी सुक्या मेव्याचा आहारात समावेश करणं गरजेचं आहे..आज पाहूयात सुक्यामेव्यातील अक्रोडाचे शरीराला होणारे फायदे..
News18
News18
advertisement

अक्रोड खाणं आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानलं जातं. अक्रोडाचा आहारात अनेक प्रकारे समावेश केला जाऊ शकतो. जाणून घेऊयात अक्रोड खाण्याचे फायदे.. आजपासून आपल्या आहारात समाविष्ट करा.

सुका मेवा म्हणजे पौष्टिकतेचा खजिना असं म्हटलं जातं. अक्रोडात फायबर, मँगनीज, मॅग्नेशियम, तांबे, लोह, कॅल्शियम, झिंक, पोटॅशियम, व्हिटॅमिन बी6, फोलेट आणि थायामिन यांसारखी पोषक तत्वं आढळतात. यामुळे शरीराला अनेक फायदे मिळतात.

advertisement

अक्रोडाचा आहारात अनेक प्रकारे समावेश केला जाऊ शकतो. तुम्ही ते नुसते म्हणजे आहेत तसे खाऊ शकता  भिजवून खाऊ शकता. अक्रोडाचे तुकडे सॅलडमध्ये घालूनही खाता येतात. तुम्ही ते नाश्त्यात ओट्समध्ये घालूनही खाऊ शकता.

Hair Care : गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय, घरीच तयार करा हे मिश्रण, तेलात मिसळून लावा..केसगळती थांबेल

1. हृदय-

advertisement

अक्रोडमध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड असते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.

2. मेंदूचं आरोग्य-

अक्रोडाचा आकार मेंदूसारखाच असतो आणि अक्रोडामुळे स्मरणशक्ती वाढवण्यास मदत होते.

3. लठ्ठपणा-

अक्रोडमध्ये उच्च फायबर आणि प्रथिनं असतात, यामुळे तुम्हाला दीर्घकाळ भूक लागत नाही. कारण यामुळे पोट भरलेलं राहतं. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

४. मधुमेह-

advertisement

रोज अक्रोड खाल्ल्यानं रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते.

Health Tips : चंदनापासून हळदीपर्यंत... थंडीच्या दिवसांत त्वचेच्या काळजीसाठी करा 'हे' घरगुती उपाय

5. हाडं -

अक्रोडमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस सारखी खनिजं असतात, जी हाडं मजबूत करण्यास मदत करतात.

६. त्वचा-

अक्रोडमध्ये असलेले आवश्यक फॅटी ऍसिड त्वचेला मॉइश्चरायझ करण्यासाठी आणि केसांचं आरोग्य सुधारण्यासाठी मदत करतात.

advertisement

कुठलाही पदार्थ अति खाल्ल्यानं त्रास होणारच त्यामुळे अतिसेवन टाळा.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Benefits of Walnuts : तब्येत तंदुरुस्त ठेवण्यासाठी खा अक्रोड, आरोग्यासाठी आहे फायदेशीर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल