Hair Care : गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय, घरीच तयार करा हे मिश्रण, तेलात मिसळून लावा..केसगळती थांबेल
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
खोबरेल तेलात घरातलेच काही जिन्नस वापरुन तयार केलेलं मिश्रण लावलं तर केसगळती कमी होईल. हे मिश्रण तयार करायला जास्त वेळही लागत नाही.
मुंबई : केस गळत असतील किंवा टक्कल पडत असेल तर एका खास तेलाविषयी ही माहिती आहे. घरोघरी वर्षानुवर्षं वापरल्या जाणाऱ्या खोबरेल तेलात काही जिन्नस मिसळून केसांना लावा, केस दुप्पट वेगानं वाढतील.
केसगळतीच्या समस्येनं अनेकजण त्रासलेले दिसतात. यापासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही केसांच्या वाढीसाठी घरच्या घरी तेल बनवू शकता. यामुळे केस गळण्याचं प्रमाण रोखण्यास मदत होऊ शकते.
केसगळती रोखण्यासाठी आणि केसांच्या वाढीसाठी विविध प्रकारचे सीरम वापरले जातात. केसांच्या वाढीसाठी
तेल आणि केसगळती कमी करण्यासाठी हजारो रुपयांचे उपचार घेतले जातात. पण इतके प्रयत्न करूनही
advertisement
अपेक्षित परिणाम मिळत नाहीत. केस गळणं थांबवण्यासाठी विविध प्रकारचे उपचार देखील केले असतील पण
विशेष फायदा झाला नसेल तर घरगुती उपाय तुम्हाला यामध्ये मदत करू शकतात.
या घरगुती उपायांमध्ये, घरातलेच आणि सहज उपलब्ध होणारे जिन्नस वापरले जातात. याचा वापर करून
advertisement
तुम्ही घरच्या घरी केस वाढवण्यासाठी तेल बनवू शकता.
केसांच्या वाढीसाठी फायदेशीर जिन्नस
भारतीय स्वयंपाकघरात मिळणारे मसाले केवळ जेवणाची चवच वाढवत नाहीत तर केसांच्या वाढीसाठीही
खूप फायदेशीर आहेत. आपल्या स्वयंपाकघरातल्या जिन्नसांमध्ये औषधी गुणधर्म असतात, त्यामुळे याचा वापर शरीरासाठी निश्चित होतो.
केसांच्या वाढीसाठी तेल कसं तयार कराल
कडुनिंबाची सुकी पानं- 20-25
वाळलेला कढीपत्ता - 20-25 पानं
advertisement
मेथी दाणे - एक वाटी
लवंगा - ७-८
पांढरे तीळ - दोन मोठे चमचे
नारळ तेल - एक वाटी
एरंडेल तेल - एक चमचा
हे तेल बनवण्यासाठी सर्वप्रथम एक तवा हलका गरम करून त्यात कडुनिंबाची पानं, कढीपत्ता, मेथी, लवंगा आणि
advertisement
पांढरे तीळ घाला. थोडेसे गरम झाले की गॅस बंद करा, चांगले बारीक करून पावडर तयार करा. खोबरेल तेल आणि एरंडेल तेलात ही पावडर घालून मिक्स करा. आता हे भांडं कापडानं झाकून 3 दिवस असंच ठेवा. तीन दिवसांनंतर तुम्ही या मिश्रणाचा वापर सुरू करू शकता, याचा परिणाम नक्की दिसेल. या तेलानं तुमचं केस गळणं कमी करण्यास मदत होईल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 04, 2024 1:44 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Hair Care : गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय, घरीच तयार करा हे मिश्रण, तेलात मिसळून लावा..केसगळती थांबेल