Girija Oak Blue Saree : निळ्या साडीमुळं एका रात्रीत 'नॅशनल क्रश' बनली गिरीजा! काय आहे या साडीचे वैशिष्ठ्य?

Last Updated:

Girija Oak Blue Saree Specialty : गिरीजाच्या अभिनयाला प्रेक्षकांनी नेहमीच दाद दिली, पण अलीकडे तिच्या एका साडीनं तिला एका रात्रीत नॅशनल क्रश बनवलं आणि सोशल मीडियावर तिचा मोठा चाहता वर्ग निर्माण झाला.

लिनन साडीचे वैशिठ्य..
लिनन साडीचे वैशिठ्य..
मुंबई : मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओक अनेक वर्षांपासून मराठी मनोरंजन विश्वात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करत आली आहे. जाहिरात क्षेत्रात नाव कमावताना तिने मराठी तसेच गुजराती रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतही दमदार कामगिरी केली आहे. गिरीजाच्या अभिनयाला प्रेक्षकांनी नेहमीच दाद दिली, पण अलीकडे तिच्या एका साडीनं तिला एका रात्रीत नॅशनल क्रश बनवलं आणि सोशल मीडियावर तिचा मोठा चाहता वर्ग निर्माण झाला.
एका साध्या मुलाखतीसाठी गिरीजाने नेसलेली निळ्या रंगाची साडी व्हायरल झाली. तिचे फोटो देशभरात वेगाने पसरले आणि नेटिझन्सनी तिला “न्यू नॅशनल क्रश” अशी उपाधीही दिली. सोशल मीडियावर तिच्या या साडीबद्दल चर्चा सुरु झाली. ही साडी कोणती, कोणत्या ब्रँडची आणि अचानक एवढा क्रेझ का निर्माण झाला? हे जाणून घेण्यात अनेकांना कुतुहल आहे.
advertisement
गिरीजाने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, तिने प्रियाला फोन करून एका शूटसाठी साडीची मागणी केली आणि त्यावर कोलॅबोरेशन पोस्ट करु असंही सांगितलं. त्यानंतर प्रियाची बहीण श्वेता हिने तिला अनेक पर्याय पाठवले, त्यातली ही स्काय ब्लू लिनन साडी गिरीजाने निवडली. या व्हायरल साडीमागे अजून एक बाब विशेष म्हणजे ती प्रिया बापट आणि तिची बहीण श्वेता यांनी सुरु केलेल्या Sawenchi या ब्रँडची आहे.
advertisement
लिनन साडीचे वैशिठ्य..
साधेपणा आणि दर्जासाठी ओळखल्या जाणाऱ्या लिनेन साड्या खूप लोकप्रिय आहेत. लिनन साडीची तन्यता नैसर्गिकरित्या कापूस आणि लोकरीच्या साड्यांपेक्षा चांगली असते. लिनेन साडीचा तंतू अंबाडीच्या झाडाच्या मधल्या भागातून मिळतो, जो त्याला ताकद देतो. याचा अर्थ लिनन साड्या उच्च दर्जाच्या असतात.
लिनेन साडीचे प्रकार
- शुद्ध लिनेन साडी
- सेमी लिनेन साडी
advertisement
- ऑरगॅनिक लिनन साडी
- सिल्क लिनेन साडी
- जरी वर्क असलेली लिनेन साडी
कोणत्या ऋतूमध्ये वापरणं योग्य..
लिनन हे बहुउद्देशीय कापड आहे. त्याचा घाम शोषून घेणारा गुणधर्म आणि मऊपणा उन्हाळ्यासाठी आदर्श बनवतो. लिनन लोकांना इतर कापडांपेक्षा 3-4 अंश जास्त थंड वाटतो. परंतु त्याच्या वॉर्प-वेफ्ट युक्त्यांमुळे ते कापड जड होते, म्हणून ही केवळ उन्हाळ्यातच नाही तर हिवाळ्यासाठी देखील एक परिपूर्ण निवड बनते.
advertisement
अशी घ्यावी लिनन साडीची काळजी
या सुंदर लिनन साडीची काळजी घेणं सोपं आहे. तुम्ही ही साडी मशीनने धुवू शकता किंवा ड्राय क्लीन करू शकता. प्रत्येक धुण्याने ती मऊ होते. धुतल्यावर रंग निघून जाणाऱ्या गडद रंगाच्या कपड्यांपासून लिनन साड्या वेगळ्या धुवा. लिननवर सहज सुरकुत्या पडतात, परंतु तुम्ही या साडीला इस्त्री करू शकता. या साड्या दाबू नका किंवा ताणू नका, कारण त्यामुळे कापड खराब होऊ शकते. लिनन साड्या बॅगमध्ये आणि उच्च तापमानापासून दूर ठेवा.
advertisement
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Girija Oak Blue Saree : निळ्या साडीमुळं एका रात्रीत 'नॅशनल क्रश' बनली गिरीजा! काय आहे या साडीचे वैशिष्ठ्य?
Next Article
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement