फेसबुकवर फोटो पाहिला, नाटक बघायला बोलावलं अन्... आण्णा नाईकांची रिअल लाईफ शेवतांसोबत हटके लव्ह स्टोरी

Last Updated:
रात्रीस खेळ चाले मालिकेतील आण्णा नाईक म्हणजेच अभिनेत माधव अभ्यंकर यांची हटके लव्ह स्टोरी तुम्हाला माहितीये का?
1/7
'रात्रीस खेळ चाले' या मालिकेतील आण्णा नाईकांची भूमिका खूप गाजली. प्रसिद्ध अभिनेते माधव अभ्यंकर यांनी आण्णा नाईकांची भूमिका साकारली होती. या भूमिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली. आण्णा नाईकांची बायकोला फसवून शेवंताला पटवण्याची खटापट सगळ्यांनी पाहिली पण आण्णा म्हणजे अभिनेते माधव अभ्यंकर यांची रिअल लाईफ शेवतांबरोबरची हटके लव्ह स्टोरी माहितीये का? 

advertisement
2/7
अभिनेते माधव अभ्यंकर आणि रेखा अभ्यंकर यांची प्रेमकहाणी ही अगदी सिनेमाच्या स्टोरीसारखी आहे. साधी पण मनाला भिडणारी आहे. संकर्षण कऱ्हाडे 'आम्ही सारे खवय्ये' मध्ये दोघांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी त्यांची लव्ह स्टोरी सगळ्यांना सांगितली.

3/7
माधव अभ्यंकर म्हणाले,
माधव अभ्यंकर म्हणाले, "2012 ला आम्ही भेटलो आणि 2014 ला लग्न केलं. हे आमचं दुसरं लग्न. आमच्यातील दुवा होती एक कॉमन मैत्रीण. तिने माझा फोटो रेखाला दाखवला आणि माझं नाव लग्नासाठी सुचवलं."
advertisement
4/7
रेखाला तेव्हा माधव अभ्यंकर नाटकात काम करतात हे माहीतच नव्हतं. दोघेही जवळजवळ वर्षभर संपर्कात होते. नंतर फेसबुकवर त्यांची नीट ओळख झाली. एके दिवशी माधव अभ्यंकर यांनी रेखाला आपलं नाटक बघायला येण्याचं निमंत्रण दिलं. ती नाटक बघायला आली. याच भेटीत पहिल्यांदा माधव अभ्यंकर आणि रेखा प्रत्यक्ष समोर आले.

5/7
पण इथेच एक मजेशीर ट्विस्ट होता. रेखाला दाखवलेला फोटो हा माधव अभ्यंकर यांच्या 35शीमधला होता. फोटोतील मी आणि नाटकातील मी यांच्यात खूप फरक होता. रेखा म्हणाल्या, मी निरखूप पाहत होते कारण ही तिच व्यक्ती आहे का जिला मी फोटोमध्ये पाहिलंय. पण याआधीच आमचं सगळं बोलून झालं होतं. प्रॉमिस वगैरे सगळं केलं होतं. मग आता नकार कसा देणार असा विचार मी करत होते.
पण इथेच एक मजेशीर ट्विस्ट होता. रेखाला दाखवलेला फोटो हा माधव अभ्यंकर यांच्या 35शीमधला होता. फोटोतील मी आणि नाटकातील मी यांच्यात खूप फरक होता. रेखा म्हणाल्या, मी निरखूप पाहत होते कारण ही तिच व्यक्ती आहे का जिला मी फोटोमध्ये पाहिलंय. पण याआधीच आमचं सगळं बोलून झालं होतं. प्रॉमिस वगैरे सगळं केलं होतं. मग आता नकार कसा देणार असा विचार मी करत होते."
advertisement
6/7
माधव अभ्यंकर पुढे म्हणाले,
माधव अभ्यंकर पुढे म्हणाले, "पण मग त्यानंतर तिने ते स्वीकारलं आणि लग्नाला होकार दिला. तिच्यामुळे मला कुटुंबाचं पॅकेजच मिळालं. 2 मुली, 2 मुलगा, 1 सून, 2 जावई, 3 नाती, 2 नातू."
advertisement
7/7
ऑनस्क्रीन आण्णा नाईक म्हणजेच माधव अभ्यंकर यांच्या ऑफस्क्रीन रेखासोबतच्या हटके लव्ह स्टोरीनं चाहत्यांची मनं पुन्हा जिंकली आहेत. फेसबुकवरील फोटोपासून नाटकातील पहिल्या भेटीपर्यंत आणि आयुष्यभरासाठी एकत्र येण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास हा खूपच इमोशनल आहे. 

Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement