काहीवेळा बहिणीला भाऊबीजेच्या दिवशीच मासिक पाळी सुरू होते. अशा परिस्थितीत म्हणजेच पीरियड्समध्ये भावाला टिळा लावणे योग्य आहे की नाही? असा प्रश्न अनेक बहिणींच्या मनात येतो. याबद्दल शास्त्र काय सांगते आणि कोणते नियम पाळणे आवश्यक आहे, हे जाणून घेऊया.
मासिक पाळीत भावाला टिळा लावण्याबद्दलचे नियम
- मासिक पाळी सुरू असताना भावाला टिळा लावण्यास धर्मशास्त्रामध्ये कोणतीही थेट मनाई नाही, परंतु काही धार्मिक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
advertisement
- तुम्हाला भाऊबीजेच्या दिवशी मासिक पाळी आली असेल, तरीही तुम्ही आपल्या भावाला टिळा लावू शकता. टिळा लावणे हे प्रेमाचे आणि कल्याणाचे प्रतीक मानले जाते, ज्यात पाळीची अवस्था आड येत नाही.
- मासिक पाळीत असलेली बहीण आपल्या भावाला मिठाई खाऊ घालू शकते आणि प्रेमभावाने ओवाळू शकते. या कृतींमध्ये ती सहभागी होऊ शकते आणि आपल्या भावाच्या कल्याणासाठी कामना करू शकते.
मासिक पाळीत या गोष्टी करणं टाळा
- मासिक पाळी सुरू असताना देवपूजा करणे आणि पूजा सामग्रीला स्पर्श करणे टाळावे. या काळात पूजेच्या पवित्र वस्तूंना स्पर्श करणे योग्य मानले जात नाही.
- टिळा लावण्यासाठी लागणारे कुमकुम किंवा अक्षता जर देवघरात असतील, तर त्यांना स्पर्श न करता दुसऱ्या व्यक्तीकडून घेऊन टिळा लावावा.
- ज्या बहिणी घरातील बाळकृष्णाच्या मूर्तीला आपला भाऊ मानून त्यांची पूजा करतात, अशा बहिणींनी पीरियड्सच्या काळात भाऊबीजेला बाळकृष्णाला स्वतः टिळा लावू नये. त्याऐवजी घरातील इतर कोणत्याही सदस्याला सांगून विधिवत पद्धतीने बाळकृष्णाला टिळा लावून ओवाळू शकतात.
अस्वीकरण : या बातमीत दिलेली माहिती आणि धार्मिक बाबींशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणतेही विधी किंवा उपाय करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
