मुंबई: मुलीं आणि महिलांमध्ये ड्रेस किंवा साड्यांइतकीच पर्सचीसुद्धा चर्चा होते. त्यामुळे मुलीं असो की महिला ट्रेंडी पर्स खरेदी करता सर्वांचाच आग्रह असतो. तसेच लग्नाकार्यात किंवा कोणत्याही सोहळ्यात पैठणीसोबत दागिने जसे साजेसे असतात. त्याचप्रमाणे स्त्रियांना पर्सही पैठणीला किंवा कोणत्याही भरजरी साडीला साजेसी मिळाली तर केलेला तो श्रृंगार, साज आणखीणचं खुलून दिसतो. कारण पैठणी साड्यांवर मॅचिंग ज्वेलरी मिळते,पण नेमकी साडीला मॅच होणारी पर्स काही मिळत नाही. त्यामुळे मुबंईत या पर्सची तुम्हाला 100 रुपयांपासून खरेदी कुठे करता येईल याबद्दच माहिती देणार आहोत.
advertisement
कुठे कराल खरेदी?
दादर पश्चिम येथील वामन हरी पेठे ज्वेलर्ससमोर असलेल्या 'राणेज' मध्ये पर्स आणि क्लचच्या हजारो आणि अनोख्या व्हरायटी पाहायला मिळतात. या पर्समध्ये क्लच, बटवे, मोठ्या पर्स, साइड बॅग असे विविध प्रकार मिळतात. या दुकानात खणाच्या पर्सची 100 रुपयांपासून ते 2000 रुपयांपर्यंत मिळतात. या पर्समध्ये खणाचे पाऊच, क्लच, ऑफिसबॅग, लहान आणि मध्यम आकारचे पैशांचं पाकीट, तसेच वारली चित्रांच नक्षीकाम असलेली कॉलेज किंवा शाळेची बॅग, असे अनेक प्रकार आहेत.
प्रत्येक पॅटर्न नुसार प्रत्येक बॅगची, पर्सची किंमत बदलते. जसं की, खणाच्या कपड्यापासून बनवलेल्या पाऊचची किंमत 100 रुपये आहे. पैठणी साडीच्या पदरावरील मोराचं नक्षीकाम असलेल्या पर्सची किंमत 600 रुपये आहे. काही खणाच्या पर्सवर मोत्याची नथ असलेली डिझाइन पाहायला मिळते. नथ असलेल्या पर्सची किंमत 750 रुपये आहे तर नथ नसलेल्या खणाच्या पर्सची किंमत 550 रुपये आहे. या सर्व पर्स आकारानेही मोठ्या आहेत. पैठणीच्या डिझाइनची पण मॅट फिनीश असलेल्या पर्सची किंमत 700 रुपयांपासून सुरु होते. तसेच खणाच्या लहान आकाराच्या क्लचची किंमत 220 तर पैठणीमध्ये असलेल्या लहान आकाराच्या क्लचची किंमत 200 रुपये आहे. त्यामुळे बजेट अगदीच कमी असेल तर हे मिनीबजेट वॉलेटही घेता येतील.
मराठी मुलगी कशी झाली मोमोज गर्ल? स्वरांगी ठरतेय अनेकांसाठी प्रेरणा
तसेच खणाच्या कपड्यातील मोठ्या आकाराच्या आणि नथ असलेल्या बॅगची किंमत 800 रुपये आहे. तर पैठणीच्या पदरापासून बनलेल्या मोठ्या आकाराच्या बॅगची किंमत 1200 रुपये आहे . प्रत्येक पर्स आणि बॅगमध्ये सुंदर आणि उठावदार रंगसंगती पाहायला मिळते.
आता मुंबईत खा न्यूयॉर्क स्टाईल चिकन स्मॅश बर्गर; पाहा बनतो कसा Video
खणाच्या किंवा पैठणीच्या पर्स फक्त पारंपारिक सोहळ्यांमध्ये किंवा साडीवरच छान दिसतात असं नाहीतर वेस्टर्न लूकवरही या पर्स, बॅग तितक्याच उठून दिसतील. खण आणि पैठणीमध्ये बनलेल्या पर्समुळे आपण केलेल्या पेहेरावात चार चॉंद लागतात. प्रत्येक महिन्याला पर्सचा ट्रेंड बदलतो मात्र खणाच्या किंवा पैठणीच्या पर्स, बॅगचा ट्रेंड आणि त्यांची पसंती कधीही कमी न होणारी आहे. त्यामुळे लग्नकार्यात, सणाला किंवा अगदी रोजचही वापरण्यासाठी खण आणि पैठणी मटेरियलच्या पर्स, बॅग, छोटे क्लच हा ट्रेंडी आणि सुंदर पर्याय नक्कीच असू शकतो, असं येथील विक्रेत्यांनी सांगितलं.