मुलांना उच्च रक्तदाब का होतो?
मुलांमध्ये 2 प्रकारचे उच्च रक्तदाब आढळून येतात. प्राथमिक उच्च रक्तदाब आणि दुय्यम उच्च रक्तदाब. प्राथमिक उच्च रक्तदाब किशोरवयीन मुलं आणि तरूणांमध्ये सर्रासपणे आढळून येतो. मात्र दुय्यम उच्च रक्तदाबाचं प्रमाण हे तुलनेनं कमी आहे. ज्या मुलांना किडनीच्या समस्या, हायपरथायरॉईडीझम, हार्मोन्सच्या असंतुलनाचा त्रास, हृदयविकार, जास्त ताण, किंव काही अनुवंशिक आजार आहेत किंवा ज्यांच्या शरीरावर औषधांचे शरीरावर दुष्परिणाम झालेत अशा मुलांमध्ये दुय्यम उच्च रक्तदाबाचा त्रास आढळून येतो.
advertisement
मुलांमधल्या उच्च रक्तदाबाची लक्षणं ?
थकवा, अशक्तपणा, डोकेदुखी ही उच्च रक्तदाबाची लक्षणं आहेत. मात्र लहान मुलांना सतत उलट्या किंवा मळमळ, छाती जड होणे, श्वास घेण्यास अडचण, हृदयाच्या ठोक्यांची गती वाढणं, डोळ्यासमोर अचानक अंधारी येणं अशी लक्षणं आढळून येऊ शकतात. मुलं मस्ती करतात, सतत खेळत राहतात, त्यामुळे त्यांच्यात ही लक्षणं जरी आढळून आली तरी ती ओळखणं कठीण जातं. त्यामुळे या लक्षणांकडे सुरूवातीला दुर्लक्ष होतं. सततच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं. कारण यामुळे हृदयविकाराचा झटका, पक्षाघात, किडनीचे आजार किंवा स्मृतिभ्रंश यासारख्या गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो.
लहान मुलांमध्ये वाढतंय उच्च रक्तदाबाचं प्रमाण
डॉ.विवेक कुमार म्हणतात की, अलीकडच्या काळात लहान मुलांमध्ये उच्च रक्तदाबाच्या तक्रारी वाढल्यात. साधारण 7 ते 8 वर्षांपूर्वी, 20-30 वर्षे वयोगटातील तरूणांमध्ये उच्च रक्तदाबाचं प्रमाण नगण्य होतं. पण आता 6 ते 19 वयोगटातील मुलांनाही उच्च रक्तदाबाचा त्रास दिसून येतोय.
हे सुद्धा वाचा : blood pressure measure रक्तदाब मोजताना या चुका करू नका; अन्यथा होईल नुकसान
सकस, पौष्टिक आहार फायदेशीर
अपोलोमेडिक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वरिष्ठ आहारतज्ञ प्रीती पांडे यांच्या मते, सकस, पौष्टिक आणि आरोग्यदायी आहाराने उच्च रक्तदाब नियंत्रित केला जाऊ शकतो. यासाठी ताजी फळं, भाज्या, संपूर्ण धान्य आणि कमी चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थांचा आहारात समावेश करणं गरजेचं आहे. लठ्ठपणा हे सुद्धा मधुमेह आणि उच्चदाबाचं एक कारण ठरू शकतं. त्यामुळेही वजन कमी करण्यासाठी नियमित व्यायाम हा सुद्धा गरजेचं आहे. आठवड्यातून किमान 150 मिनिटं चालणं, एरोबिक्स, पोहणं आणि सायकल चालवण्यासारख्या व्यायामांनी उच्च रक्तदाबाचा त्रास कमी होऊ शकतो. याशिवाय योगासनांच्या मदतीने ताणतणाव कमी होऊ शकतो. आहारातून मिठाचं प्रमाण कमी केल्याने सुद्धा रक्तदाब नियंत्रणात राहायला मदत होते.